breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वाकडच्या गावठाण परिसरात सिमेंटचे रस्ते करा, नागरिकांची मागणी

स्थायी समिती सभापती ममता गायकवाड यांना निवेदन 

पिंपरी ( महा ई न्यूज ) – वाकड येथील प्रभाग क्रमांक 25 मधील गावठाण परिसरातील रस्ते खराब झाले आहेत. डांबरी रस्त्यावर वारंवार खड्डे पडल्याने रस्ता दुरुस्तीच्या वारंवार तक्रारी महापालिकेकडे केल्या आहेत.  तरीही या रस्ता दुरुस्तीकडे स्थापत्य विभागाचे दुर्लक्ष आहे. याबाबत स्थायी समिती सभापती ममता गायकवाड यांच्याकडे चिंचवडच्या भाजप महिला अध्यक्षा भारती विनोदे व ड प्रभाग स्वीकृत सदस्य कांतीलाल भूमकर यांनी वाकडच्या गावठाण परिसरातील रस्ते सिमेंटचे करावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
वाकडच्या प्रभाग क्रमांक २५ मधील रस्ते सिमेंट काँक्रिटचे करणे, भुजबळ वस्ती ते भूमकर वस्ती हिंजवाडीकडे एम. डी. आर.३१ रस्त्याला जोडणारा ३०मी. रुंदीचा डी. पी. रस्ता विकसित करणे, भुजबळ वस्ती ते हिंजवडी हद्दीपर्यंत विकास योजनेतील २४ व ३० मी रुंदीचा रस्ता विकसित करणे,  पुणे-बेंगलोर महामार्गावरील पुलापासून हिंजवडी मनपा हद्दीपर्यंत रस्ता रुंदीकरण करण्यासंदर्भात निवेदन दिले आहे.
वाकड परिसरात नागरिकांच्या मागणीनुसार व लोकहितासाठी संपुर्ण रस्ते सिमेंटचे करण्यात येतील, सिमेट रस्त्याच्या कामांचा योग्य तो पाठपुरावा करून ही कामे लवकरात लवकर मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन स्थायी समिती सभापती ममता विनायक गायकवाड यांनी त्यांना दिले आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button