breaking-newsमुंबई

वर्तमानपत्रात गुंडाळून आणलेले पदार्थ खाणं, आरोग्यास हानीकारक

मुंबई – अनेकांना वर्तमानपत्रातून काही पदार्थ पेपरमध्ये बांधून आणलेलं पाहायला मिळतं. पण अशाप्रकारे वर्तमानपत्रात गुंडाळून आणलेले पदार्थ खाणं आरोग्यास हानीकारक ठरु शकतं. विशेषज्ञांनी अशाप्रकारच्या खाण्यामुळे शरीराला धोका निर्माण होऊ शकत असल्याचं सांगितलं आहे.

वृत्तपत्र छापताना ज्या प्रकारच्या शाईचा उपयोग केला जातो, त्यात हानीकारक रसायन असतात. हे रसायन इतके हानीकारक असतात की, यामुळे कॅन्सरसारखा आजारही उद्भवू शकतात. वर्तमानपत्रावर गरम जेवण, पदार्थ ठेवल्याने अनेकदा पेपरवरची शाई खाद्यपदार्थाला चिकटते. आणि ती पदार्थासोबत आपल्या पोटात जाते.

FSSAI ‘फूड सेफ्टी अँड स्टँडर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया’ने देखील अनेकदा पेपरमध्ये ठेवलेले अन्नपदार्थ खाणं आरोग्यासाठी हानीकारक असल्याचं सांगितलं आहे. पेपरवर असलेली शाई, अन्नपदार्थांद्वारे आपल्या शरीरात जाते म्हणजे एकप्रकारे केमिकलच आपल्या पोटात जातं. यामुळे पचनासंबंधी समस्या होण्याची शक्यता असते. या केमिकलचा हार्मोन्सवरही परिणाम होऊ शकतो.

पेपरमध्ये ठेवलेलं तेलकट पदार्थ खाणं तर अधिक धोकादायक आहे. खाद्यपदार्थाला चिटकून जे हानिकारक केमिकल पोटात जातात, त्यामुळे मुत्राशय, फुफ्फुसांचा कर्करोगही होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे, वर्तमानपत्रात गुंडाळलेले कोणतेही खाद्यपदार्थ, पेपरमधील अतिशय तेलकट पदार्थ खाणं शक्यतो टाळा. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button