breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडा

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यामार्फत मेहबूब शेख यांची तपासणी करा

विधानपरिषदेचे उपसभापती नीलम गोऱ्हे यांची मागणी

औरंगाबाद । प्रतिनिधी

बलात्काराचा आरोप असलेल्या मेहबूब शेख प्रकरणाचा तपास महिला पोलीस अधिकाऱ्याकडे सोपवावा, अशी मागणी विधानपरिषदेचे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. या प्रकरणात ‘बी समरी रिपोर्टची’ शक्यता लक्षात घेत हा तपास वरिष्ठ महिला पोलिस अधिकाऱ्याकडे देण्याची मागणी केली. त्यांनी या संदर्भात प्रसिद्धी पत्रक काढून ही मागणी केली. या अत्याचाराच्या प्रकरणात पोलिस ‘बी समरी फाईल’ करु शकतात. तसेच मेहबूब शेख हा तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांवर दबाव आणत असल्याचे गोऱ्हे यांनी नमूद केले.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख याच्याविरोधात सिडको पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोकरी लावण्याचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा आरोप औरंगाबादमधील खाजगी शिकवणी घेणार्‍या 29 वर्षीय तरुणीने केला आहे. “माझ्यावर अत्याचार करणारा व्यक्ती हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेखच आहे. आता मला जे काही बोलायचं आहे ते कोर्टात बोलेन,” असं तरुणीने म्हटलं आहे. मेहबूब शेख यांनी त्यांच्यावरील बलात्काराचे आरोप फेटाळले होते, त्यावर तरुणीने आपली बाजू मांडली आहे.

याप्रकरणी नीलम गोऱ्हे यांनी हे प्रसिद्धीपत्रक काढले आहे. या पत्रात नीलम गोर्‍हे म्हणतात की, औरंगाबादमध्ये एका पक्षाच्या कार्यकर्त्याने नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याची घटना मीडियाच्या माध्यमातून समोर आली आहे. यात आरोपी म्हणतो तो मी नव्हेच! याशिवाय पीडित मुलीवर आणि कुटुंबावर दबाव आणत आहे. त्यामुळे पूर्वीच्या केसेसप्रमाणे या केसमध्ये देखील पोलिसांकडून ‘बी समरी रिपोर्ट’ दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या घटनेचा तपास वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात यावा. तसेच औरंगाबाद इथल्या महिलांवरील अत्याचाराच्या बऱ्याच केसेसमध्ये बी समरी रिपोर्ट करुन त्या केसेस बंद करण्यात आल्या आहेत. ज्या प्रकरणात बी समरी रिपोर्ट करुन बंद केल्या आहेत, त्याचा आढावा घेण्याची सूचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी द्यावी, अशी मागणी गोऱ्हे यांनी केली.

बलात्काराचे आरोप असलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेखला निर्दोष सिद्ध करण्यासाठी राष्ट्रवादीची फौज मैदानात उतरली आहे. परंतु राष्ट्रवादीसोबत सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या नेत्या आणि विधानपरिषदेचे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मेहबूब शेखला मोठा दणका दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button