breaking-newsपुणेमहाराष्ट्र

लोणंद बाजार समितीत कांद्याला ३७०० रुपयांचा दर

खरिपातील कांदा अजून बाजारात न आल्याने कांद्याच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील कांद्याची मोठ्या लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ५०० हळवा व गरवा कांदा पिशवीची आवक झाली. दरम्यान, कांद्याचे दर ३७०० रुपयांपर्यंत तेजीत निघाले असल्याची माहिती सभापती राजेंद्र तांबे व उपसभापती दत्तात्रय बिचुकले यांनी दिली.

महाराष्ट्रात पूरपरिस्थिती ओढवल्याने कांदा उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यात खरिपातील कांदा अजून बाजार न आल्याने कांद्याच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत. ऐन सणासुदीच्या तोंडावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. पूरपरिस्थिमुळे अनेक पिकांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे जूनमध्ये होणारी लागवड सप्टेंबरमध्ये करण्यात आली. या कांद्याची आवक नोव्हेबर डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता ऐन सणासुदीत कांद्याच्या किंमतीने शंभरीकडे वाटचाल सुरू केली आहे.

लोणंद बाजार समितीच्या कांदा बाजारात बाजार समितीच्या आवारात ५०० हळवा, गरवा कांदा पिशवीची आवक झाली. कांदा नंबर १ – ३००० ते ३७०० रुपये, कांदा नंबर २- २००० ते ३००० रुपये, कांदा गोल्टी १२०० ते २००० रुपयांपर्यंत दर पोहोचले होते. भुसार बाजारात ज्वारीचे दर २८०० रुपये, बाजरी २३०० रुपये, गहू २३०० रूपयांपर्यंत पोहोचले आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांनी आपला माल चांगला वाळवून व निवडून विक्रीसाठी लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीत आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सचिव विठ्ठल सपकाळ यांच्याकडून करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button