breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

लोकसभेच्या 48 मतदारसंघांत 96 हजार “व्हीव्हीपॅट’ यंत्रे

मुंबई – लोकसभा निवडणुकीसाठी या वर्षी प्रथमच व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरीफायबल पेपर ऑडिट्रेल) यंत्रांचा वापर केला जाणार असून, महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांसाठी 96 हजार “व्हीव्हीपॅट’ यंत्रे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

राज्यातील 96 हजार मतदान केंद्रांवर काम करणाऱ्या सहा लाख कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यांना तीन पातळ्यांवर प्रशिक्षण दिले जाईल. “व्हीव्हीपॅट’ यंत्रणा ईव्हीएम यंत्रांसाठी पूरक असून, मतदान केल्याची पावती या यंत्रांच्या माध्यमातून मतदारास मिळणार आहे. मतदाराने ज्या उमेदवाराला मत दिले त्यासंदर्भात माहिती “व्हीव्हीपॅट’ यंत्रावरील कळ दाबल्यानंतर मिळू शकेल. मतदान केंद्रांमध्ये ही यंत्रे बसविण्यात येणार आहेत. मतदान केल्यानंतर सात सेकंदांमध्ये मतदाराला पावती मिळणार असून, त्यावर निवडणूक चिन्ह, नाव व उमेदवाराचा मतपत्रिकेतील अनुक्रमांक नमूद असेल. या पावतीमुळे मतदाराला त्याने दिलेल्या मताची खात्री करणे शक्‍य होईल. या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सर्वत्र प्रथमच या लोकसभा निवडणुकीत होणार आहे. त्यासाठी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडून “व्हीव्हीपॅट’ मशिनच्या वापराबद्दल सूचना निवडणूक यंत्रणेला देण्यात आली आहे.

एकूण एक लाख 35 हजार यंत्रे
महाराष्ट्रासाठी सुमारे एक लाख 35 हजार “व्हीव्हीपॅट’ यंत्रे उपलब्ध करून देण्यात येतील. त्यापैकी प्रत्येक मतदान केंद्रावर एक याप्रमाणे 96 हजार यंत्रांचा वापर या निवडणुकीत केला जाणार आहे. तर, अतिरिक्त “व्हीव्हीपॅट’ यंत्रे विभागीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात येतील, असे राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button