breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

लोकसभा सभापतींच्या हस्ते क्रांतीवीर चापेकर याच्या पोस्ट तिकिटाचे अनावरण

खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती 

पिंपरी –  क्रांतीवीर दामोदर हरी चापेकर यांच्या नावाने पोष्टाचे तिकीट काढण्यात आले आहे. या टपाल तिकीटाचे अनावरण लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांच्या हस्ते रविवारी (दि.8) चिंचवडच्या चापेकर वाड्यात होणार आहे, अशी माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, कार्यवाह सतीश गोरडे, सह कार्यवाह रवी नामदे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे उपस्थित होते.

चिंचवड येथील चापेकर वा़ड्यात रविवारी (दि.8) दुपारी अडीच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास केंद्रीय दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महापौर नितीन काळजे, शिरुरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, राज्यसभेचे खासदार अमर साबळे, महाराष्ट्र व गोवा राज्याचे मुख्य पोस्टमास्तर हरिश अगरवाल, चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे आदी उपस्थित राहणार आहेत.

खासदार बारणे म्हणाले, “क्रांतीवीर चापेकर बंधुचा इतिहास संपूर्ण देशभर प्रसिध्द आहे. क्रांतीवीर दामोदर हरी चापेकर यांनी 1897 मध्ये वाल्टर चार्ल्स रॅण्डचा वध केला होता. एकाच परिवारातील तीन भावंडे स्वातंत्र्य संग्रामासाठी शहीद झाले होते. क्रांतीवीर चापेकरांच्या नावाने पोस्टाचे तिकीट काढण्याबाबत मी गेली तीन वर्ष पाठपुरावा करत होतो. चापेकरांच्या स्वातंत्र्य संग्रामाचे सर्व पुरावे संबंधित मंत्रालयात दिले होते. या माझ्या पाठपुराव्याला यश आले”

“केंद्र सरकारने  दामोदर हरी चापेकर यांच्या नावाने पोस्टाचे तिकीट काढण्यास परवानगी दिली आहे. चापेकरांच्या नावाने पोस्टाचे तिकीट सुरु होणे, ही शहरवासियांसाठी अभिमानाची बाब आहे. असेही बारणे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button