breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रियव्यापार

लॉकडाऊन आणि कोरोनामुळे ठप्प झालेल्या पर्यटन व्यवसायाला हळूहळू वेग; प्रसिद्ध पर्यटनस्थळे होत आहेत अनलॉक

लॉकडाऊन आणि कोरोनामुळे ठप्प झालेल्या पर्यटन व्यवसायाला हळूहळू वेग येत आहे. पर्यटन राज्य हिमाचलच्या सीमा उघडताच २० सप्टेंबरपासून मनाली पर्यटकांनी गजबजू लागली आहे. २३ तारखेपासून उत्तराखंडनेही पर्यटकांवरील बंदी उठवली. उत्तर प्रदेश सरकारने २१ सप्टेंबरपासून ताजमहाल उघडला आहे. पुद्दुचेरीत क्वाॅरंटाइन नियम शिथिल केल्याने पर्यटन सुरू झाले आहे. गोव्यात तर नुसते हॉटेलचे बुकिंग दाखवले तरी प्रवेश दिला जात आहे.पर्यटकांकडून 20 लाख कोटी रुपये वार्षिक उत्पन्न मिळायचे. मात्र यंदा कोरोनामुळे पर्यटन व्यवसायाला फटका बसला , 3 कोटी लोक बेरोजगार झाली आहेत.

दरम्यान, हॉटेल्सच्या भाड्यात प्रचंड घसरण झाल्यामुळे टूर अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांनी पॅकेजचे दर निम्म्यावर आणले आहेत. हॉटेल अँड रेस्तराँ असोसिएशननुसार, सध्या हॉटेलचे भाडे नाममात्र आहे. आम्ही तर ४० टक्के कमी भाड्यातही रूम बुक करत आहोत. इतकेच नव्हे तर ताज आणि मॅरियटसारखे हॉटेल्सही ७५ टक्के कमी दराने बुक होत आहेत. दुसरीकडे, उत्तराखंड पर्यटन विभागाचे अधिकारी प्रदीप चौहान म्हणाले, यंदा चारधाम यात्रेत आजवर फक्त ३५ हजारच भाविक आले आहेत. आधी दरवर्षी दररोज ३५ हजार भाविक यायचे. आजही पर्यटक घराबाहेर पडण्यास कचरत असल्याने मनाली व चारधाम यात्रेचे पॅकेज गतवर्षाच्या तुलनेत ४० टक्के स्वस्त झाले आहे.

हिमाचलात सध्या ४५% पर्यटक आले आहेत. उत्तराखंडातून विचारणा होत असून ऑक्टोबराचे बुकिंग सुरू आहे. २०% लोक ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून व ८०% स्वत:च बुकिंग करत आहेत. गेल्या ७ महिन्यांचे नुकसान भरून निघणार नाही, मात्र ऑक्टोबरचा खर्च निघून जाईन. देशात दरवर्षी २० लाख कोटी रुपयांची उलाढाल व्हायची. ती आता नाममात्र उरल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

हॉटेलचे भाडे तर तब्बल ६० ते ७५ टक्क्यांपर्यंत स्वस्त झाले आहे. ताज आणि मॅरियटसारख्या आलिशान हॉटेल्सच्या रूम अवघ्या ४ हजार रुपयांत मिळताहेत. गेल्या १० वर्षांत या खोल्यांचे भाडे १२ ते २० हजार रुपयांदरम्यान राहिलेले आहे. केरळ आणि गोव्यात थ्री स्टार ३ दिवसांचे पॅकेज यापूर्वी १० हजार रुपयांपेक्षा कमी नव्हते. यंदा येथे ते अवघ्या ७ हजार रुपयांत मिळत आहे. गोव्यात ऑफर म्हणून ३ दिवसांचे पॅकेज केवळ ५ हजार रुपयांतच दिले जात आहे.

१० दिवसांच्या चारधाम यात्रेचे पॅकेज प्रति व्यक्ती ३० हजार रुपयांपेक्षा कमी कधीही राहिलेले नाही. आता हे पॅकेज २२ हजार रुपयांतच मिळत आहे. पहिल्यांदाच प्रत्येक पॅकेजमध्ये वेगवेगळ्या कुटुंबांना वेगवेगळी वाहने अगदी माेफत उपलब्ध करून दिली आहेत. यापूर्वी एकाच वाहनामध्ये सर्व पर्यटक भरले जायचे.

लॉकडाऊनमुळे निश्चित तारखेला प्रवासाला जाऊ न शकल्यास कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, उलट पुढील दोन वर्षांत कधीही पर्यटनास जाता येईल अशी सुविधा टूर व ट्रॅव्हल्स कंपन्या देत आहेत.मात्र याबाबतही काही नियम कठोर केले आहेत.

  1. चारधाम यात्रेत आता एका जणासोबत दोनच व्यक्तींना थांबता येईल. एका हाॅलमध्ये अनेक भाविकांच्या निवासाची पद्धत बंद करण्यात आली आहे.
  2. पर्यटक संख्या वाढू नये म्हणून उत्तराखंडच्या हद्दीवरच त्यांना रोखून स्टेडियमकडे पाठवले जाते.
  3. हिमाचलात रोज ५ हजार पर्यटकांची मर्यादा, सिक्कीममध्ये २.५ हजार पर्यटकांची मर्यादा सरकारने घालून दिली आहे.
  4. ताजमध्ये दिवसभरात ५ हजार व आग्रा किल्ल्यात २५०० जणांनाच प्रवेश. सध्या ताज दर्शनासाठी रोज १ हजार पर्यटक येत आहेत.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button