breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रियव्यापार

लॉकडाऊनमुळे सरकारी कर्मचारी आणि खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाना मोठा आर्थिक फटका

 करोना व्हायरसमुळे लागू करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनचा परिणाम आता सरकारी कर्मचारी आणि खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठीही आर्थिक स्तरावर फटका ठरतोय. लॉकडाऊनमुळे उद्योगधंद्यांवर मोठा परिणाम झालाय. त्यामुळे उत्पन्नातही घसरण झालीय. याचा ताण अर्थव्यवस्थेवरही दिसून यायला सुरुवात झालीय. यानंतर, केरळ सरकारनंही सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्याचा निर्णय घेतलाय. यापूर्वी केंद्र सरकारनंही करोनाशी लढा देताना खासदारांच्या वेतनात एका वर्षासाठी ३० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला होता. इतकंच नाही तर खासगी क्षेत्रात ‘ऑनलाईन हॉटेल बुकींग’मध्ये अग्रगण्य प्लॅटफॉर्म असलेल्या ‘ओयो’नंही आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्याचा निर्णय जाहीर केलाय.

केरळ सरकारनं पगार कपातीच्या निर्णयाला विरोधी पक्षाकडून तसेच कर्मचारी संघाकडून विरोध दर्शवण्यात आला होता. त्यानंतरदेखील करोनाच्या पार्श्वभूमीर राज्य सरकारनं हा निर्णय जाहीर केलीय. २० हजारांहून अधिक पगार असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात ही कपात होणार आहे. सरकारनं मे ते सप्टेंबर महिन्यादरम्यान ५ टप्प्यांत डॉक्टर आणि नर्ससहीत सर्व कर्मचाऱ्यांचा १ महिन्याचा पगार कापण्याचा निर्णय घेतलाय

करोनाचा वाढता धोका आणि सरकारच्या तिजोरीवरचा वाढता खर्च लक्षात घेता केंद्र सरकारनंही याआधी खासदारांच्या वेतनकपातीचा निर्णय घेतलाय. खासदारांच्या वार्षिक पगारात ३० टक्क्यांची कपात केली जाणार आहे. याशिवाय, खासदार निधीही २ वर्षांपर्यंत स्थगित करण्यात आलाय. याशिवाय राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींनीही आपल्या वेतनात कपात करण्याचा निर्णय घेतलाय. ही कपात कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात केली जाणार आहे

देशाची फेमस ऑनलाईन हॉटेल बुकिंग कंपनी ‘ओयो – हॉटेल अँन्ड होम्स’नं आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात केलीय. ओयोच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना एका ई-मेलद्वारे ही माहिती दिलीय. या ईमेलमध्ये करण्यात आलेल्या उल्लेखानुसार, कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात २५ टक्क्यांची कपात करण्यात येणार आहे. ही कपात एप्रिल-जुलै २०२० साठी लागू होईल

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button