breaking-newsटेक -तंत्रपिंपरी / चिंचवड

लॉकडाउनमध्ये कामगारांना दुचाकीची परवानगी मिळाली; आमदार महेश लांडगे, लघु उद्योग भारतीच्या पाठपुराव्याला यश

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून आमदार लांडगे यांचे आभार

पिंपरी । प्रतिनिधी
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील लॉकडाउन दरम्यान औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या सुरू ठेवण्याचा निर्णय झाला. पण, कामगारांना दुचाकी किंवा सायकलद्वारे कंपनीपर्यंत जाण्याची परवानगी नाही, अशी स्थिती होती. मात्र, लघु उद्योग भारती आणि आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्यामुळे प्रशासनाने
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने पुन्हा लॉकडाउन केला. १३ जुलैच्या मध्यरात्रीपासून हा लॉकडाउन सुरू होत आहे. उद्योग आणि कामगारांच्या हिताच्या दृष्टीने लॉकडाउनमधून उद्योगांना वगळावे, अशी आग्रही मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली होती. तसेच, शहरातील औद्योगिक संस्था, संघटनांनीही प्रशासनाकडे आग्रह धरला होता. त्याला यश मिळाले आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी लॉकडाउनमधून औद्योगिक वसाहती वगळण्याचा महत्तपूर्ण निर्णय घेतला.
लघु उद्योग भारतीचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष दिपक फल्ले म्हणाले की, एमआयडीसीतील कारखाने, उद्योगधंदे व आयटी कंपन्यांना अटी शर्तींसह परवानगी देण्यात आली आहे. पण शहरातून दररोज जाण्याची परवानगी प्रशासनाने दिली नाही. चारचाकी आणि बसला परवानगी दिली होती. मात्र, छोटे उद्योजकांकडे काम करणारे बहुसंख्य कर्मचारी सायकल अथवा दुचाकीद्वारे प्रवास करीत असतात. एक किंवा दोन किमी अंतरावरील वस्त्यांमधून येणाऱ्या कामगारांसाठी बस उपलब्ध होत नाही. छोटे उद्योजकांना बस सुविधा उपलब्ध करुन देणे परवडणारेही नाही. त्यामुळे लघु उद्योग भारतीचे संचालक राममूर्ती थेवर यांच्या पुढाकाराने आम्ही आमदार महेश लांडगे यांच्याकडे कामगारांना दुचाकी व सायकल परवानगीसाठी मदत करण्याची मागणी केली.
दरम्यान, आमदार महेश लांडगे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर आणि पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्याशी चर्चा केली. कामगार आणि लघु उद्योजकांची अडचण लक्षात घेवून प्रशासनाने तात्काळ कामगारांसाठी दुचाकी आणि सायकल परवानगी दिली, अशी माहिती लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष दिपक फल्ले यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button