breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

लॉकडाउनमध्येही ‘KBC’ च्या 12 व्या पर्वासाठी रजिस्ट्रेशन सुरू

छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय आणि चर्चेत असणारा शो म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती.’ हा शो सुरु झाल्यापासून बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन या कार्यक्रमाची धुरा सांभाळत आहेत. आजवर या शोचे ११ पर्व झाले असून बिग बींनी सूत्रसंचालकाची जबाबदारी अतिशय उत्तम रित्या पेलली आहे. त्यामुळे हा शो अनेकांच्या मनात घर करुन आहे. या शोचे११ पर्व झाल्यानंतर प्रेक्षकांना १२ व्या पर्वाची उत्सुकता लागली आहे. विशेष म्हणजे हा नवीन पर्व लवकरच सुरु होणार असून बिग बींनी तशी घोषणा केली आहे.

सध्या लॉकडाउनचा काळ सुरु असल्यामुळे घरात राहून प्रत्येक जण कंटाळला आहे. यामध्येच अमिताभ बच्चन यांनी १२ वं पर्व सुरु होणार असल्याची घोषणा केली आहे. सोबतच या नव्या पर्वासाठी नावनोंदणीही सुरु झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

सोनी टीव्हीने ‘कौन बनेगा करोडपती’चा एक नवा प्रोमो व्हिडीओ शेअर केला असून त्यात अमिताभ बच्चन १२ व्या पर्वाची घोषणा करताना दिसून येत आहेत. त्यामुळे केबीसी २०२० मधील नवीन पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत असल्याचं लक्षात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button