breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

लॉकडाउननंतर स्पेनमध्ये किनारे, रेस्टॉरंट खुले

अथेन्स (ग्रीस) | ग्रीसमध्ये पर्यटनाच्या हंगामाला चालना देण्यासाठी बेटांवरील नियमित जलवाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. काही रेस्टॉरंट आणि बारही पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मार्चमध्ये लॉकडाउन जाहीर केल्यापासून केवळ बेटांवरील स्थानिक नागरिक आणि मालवाहतुकीसाठी फेरी सेवा सुरू होती. ग्रीसच्या अर्थव्यवस्थेमध्ये पर्यटनाचा खूप मोठा वाटा आहे. दर वर्षी ग्रीसला ३४ लाख पर्यटक भेट देतात. त्यातून १८.२ अब्ज युरोची उलाढाल होते.

माद्रिद | करोना संसर्गाचे थैमान सहन करणाऱ्या स्पेनमध्ये अखेर लॉकडाउनचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर आता समुद्रकिनारे, रेस्टॉरंट्स पर्यटक ग्राहकांसाठी खुले करण्यात येणार आहेत. त्यासाठी रेस्टॉरंट्स सज्ज झाली असून आसनव्यवस्थेतही निर्देशांप्रमाणे बदल करण्यात आले आहेत. बार्सिलोनात रेस्टॉरंट्समध्ये ‘आउटडोअर सीटिंग’साठी ५० टक्के जागेवरच ग्राहकांना बसण्यास परवानगी देण्यात आली आहे. माद्रिद आणि बार्सिलोनामध्येच करोना संसर्गाचा उद्रेक झाला होता. स्पेनमध्ये एकूण २८,७५२ करोना बळ‌ी गेले आहेत. प्रांतांमधील प्रवासाला जूनअखेरपर्यंत बंदीच राहणार आहे, तसेच परदेशी प्रवाशांना जुलैपर्यंत परवानगी मिळणार नाही.

जोहान्सबर्ग | दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रॅमाफोसा यांनी देशातील लॉकडाउन १ जूनपासून शिथिल करण्याचे जाहीर केले, मात्र देशात करोना संसर्ग अधिक वाढू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला आहे. दहा आठवड्यांच्या लॉकडाउनमुळे देशाची परिस्थिती इतर देशांच्या तुलनेत सुधारली आहे, असेही ते म्हणाले. ‘लॉकडाउनमुळे करोना संसर्ग पुढे ढकलला जाऊ शकतो, पण थांबविला जाऊ शकत नाही. जोपर्यंत लस उपलब्ध होत नाही, तोपर्यंत करोना पसरत राहील. याचा अर्थ आपण करोना विषाणूसोबतच जगण्याची सवय केली पाहिजे,’ असे रॅमाफोसा म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button