breaking-newsआंतरराष्टीय

लैंगिक गैरवर्तनातील अधिकाऱ्यास गुगलने दिली मोठी रक्कम

गुगलने माजी अधिकारी अमित सिंघल यांनी २०१६ मध्ये लैंगिक छळवणुकीच्या आरोपाखाली राजीनामा दिल्यानंतर त्यांना ४५ दशलक्ष डॉलर्सची रक्कम देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

सिंघल हे गुगल सर्च ऑपरेशनचे काम करीत होते व ते त्या वेळी उपाध्यक्षपदी काम करीत होते. त्यांना किती रक्कम देण्यात आली हे सोमवारी भागधारकांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेत जाहीर करण्यात आले असून लैंगिक गैरवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यास एवढी मोठी रक्कम देऊन अल्फाबेट या गुगलच्या मातृ कंपनीने जबाबदारी टाळली आहे, असा आरोप करण्यात आला आहे. दी न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्राने याचे वृत्त दिले आहे.

गुगलने लैंगिक छळवणुकीची प्रकरणे योग्य प्रकारे हाताळली नसल्याच्या वादातून भागधारकांनी जानेवारीत कॅलिफोर्निया न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यात संचालक मंडळाच्या बैठकीतील चर्चेचा काही भाग वगळण्यात आला होता पण सोमवारी दाखल केलेल्या नव्या याचिकेत कुठलाही भाग न वगळता याचिका दाखल केली आहे. गुगलने सिंघल यांना दोन वर्षांकरिता १५ दशलक्ष डॉलर्स व तिसऱ्या वर्षी ५ ते १५ दशलक्ष डॉलर्स देण्याचे  मान्य केले होते. स्पर्धक कंपनीत त्यांनी जाऊ नये यासाठी त्यांना ही तडजोड रक्कम देण्याचे मान्य करण्यात आले नंतर त्यांनी उबर कंपनीत नोकरी स्वीकारली होती.

भागधारकांचे वकील फ्रँक बोटिनी यांनी सांगितले, की संचालक मंडळाने लैंगिक छळवणूक करणाऱ्या अधिकाऱ्याला पैसे देऊन जबाबदारी टाळली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button