breaking-newsमुंबई

लैंगिक आकर्षणातून अल्पवयीन मुलींना लक्ष्य; रेहानची कबुली

नवी मुंबई : मित्रांसोबत ब्ल्यू फिल्म पाहण्याच्या सवयीतून आपले लैंगिक आकर्षण वाढल्याची कबुली रेहान कुरेशीने दिली आहे. या उत्सुकतेमुळेच त्याने २०१० मध्ये कुर्ला येथील नेहरूनगर परिसरात दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केला. या वेळी त्या आरडाओरडा करतील, या भीतीने त्यांचे तोंड आणि गळा दाबल्याने गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचीही कबुली त्याने दिली आहे.

पॉक्सोच्या १७ गुन्ह्यांत नवी मुंबई पोलिसांच्या अटकेत असलेल्या रेहानने २०१० मध्ये कुर्ल्याच्या नेहरूनगर परिसरात दोन अल्पवयीन मुलींच्या हत्येची कबुली दिली. १५ दिवसांच्या अंतरात या घटना घडल्या होत्या; परंतु गुन्हेगाराचा सुगावा लागत नसल्याने आठ वर्षांपासून सीआयडीमार्फत या गुन्ह्यांचा तपास सुरू होता. या दरम्यान, सदर परिसरातील संशयित ९५८ जणांचे डीएनए नमुने तपासण्यात आले होते. दरम्यान गेल्या महिन्यात मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, पालघर परिसरात पॉक्सोचे गुन्हे करणाऱ्या रेहान कुरेशीला गुन्हे शाखा पोलिसांनी शिताफीने अटक केली.

चौकशीत त्याने गुन्ह्यांची कबुली दिली. मात्र, आजवर तो कोणत्या ठिकाणी राहायला होता, याबाबतच्या चौकशीत त्याच्या नातेवाइकांकडून कुर्ल्याचा उल्लेख वगळला जात होता. मात्र, रेहान कुरेशी हा सहकुटुंब कुर्ल्याच्या कसाईवाडा परिसरात राहिलेला असल्याने २०१० मधील दोन गुन्ह्यांत त्याचा समावेश असावा, असा संशय पोलिसांना होता. त्यानुसार रेहानचे नमुने डीएनए तपासणीकरिता पाठविले होते. त्यानुसार दोन्ही अल्पवयीन मुलींवर रेहाननेच बलात्कार केल्याचे स्पष्ट झाले असता, अधिक चौकशीत त्याने कबुली दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button