breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारणराष्ट्रिय

लीगल राइट्स काउंसिल इंडियाच्या योगदानातून मोदींचा वाढदिवस साजरा

पिंपरी | महाईन्यूज

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 70 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने देशभरात वेगवेगळ्या पद्धतिने त्यांचा वाढदिवस साजरा करून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. त्याप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70 व्या जन्मदिवसानिमित्त लीगल राइट्स काउंसिल इंडियाच्या योगदानातून 70 देशांतून प्राप्त झालेले आदरपुर्वक 70 शुभेच्छासंदेश हे एकाचवेळी भारत, युके, थायलँण्ड, सिंगापूर आणि नेपाळ येथे 70 मिनिटांची डाँक्यूमेंट्री स्वरूपात 70 ठिकाणी प्रसारित करण्यात आली. या अभुतपुर्व कार्यक्रमाचे लाँचिंग हिमाचल प्रदेश येथे राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या हस्ते करण्यात आले.

महाराष्ट्रातील ठराविक शहरांपैकी पिंपरीे चिंचवड येथे भाजपा शहर महिला आघाडीच्या वतीने सदर डाँक्युमेंट्रीचे लाँचिंग भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप व प्रदेश अध्यक्षा उमा खापरे यांच्या सूचनेनुसार शैला मोळक यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

दरम्यान, कार्यक्रमप्रसंगी प्रदेश महिला मोर्चा चिटणीस क्रांती सोमवंशी, कार्यकारीणी सदस्य कोमल काळभोर, महिला अध्यक्षा उज्वला गावडे , जिल्हा पदाधिकारी आशा काळे, शोभा भराडे, पुष्पा सुबंध, रेखा कडाली, सर्व महिला पदाधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमसाठी शहर सरचिटणीस राजू दुर्गे, शैला मोळक व क्रांती सोमवंशी यांनी मार्गदर्शन केले. तसेच महिला आघाडीच्या वतीने 70 दिवे लावून मोदींचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तर, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडल अध्यक्षा गीता महेंद्रू यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button