मे महिन्यातील जीएसटी कलेक्शन घटले
नवी दिल्ली – मे महिन्यातील जीएसटीचे कलेक्शन घटले आहे. एप्रिल महिन्यात जीएसटीचे कलेक्शन 1 लाख 3 हजार कोटी रूपये इतके झाले होते पण मे महिन्यात ते केवळ 94 लाख तीन हजार कोटी रूपये इतकेच झाले आहे असे सरकारतर्फे आज सांगण्यात आले. मे महिन्यात एकूण 62 लाख् 47 हजार व्यावसायिकांनी आपले विवरणपत्र दाखल केले आहे.
मे महिन्यातील हे कलेक्शन कमी असले तरी गेल्या वर्षीच्या एकूण मंथली ऍव्हरेज पेक्षा हे कलेक्शन जास्तच आहे असे सरकारचे म्हणणे आहे. जीएसटीतून राज्यांना नुकसानभरपाई पोटी दिली जाणारी रक्कम नियमीतपणे अदा केली जात असून नुकतीच मार्च महिन्याची 6696 कोटी रूपयांची राज्यांची नुकसान भरपाई अदा करण्यात आली आहे असेही सरकारकडून सांगण्यात आले आहे. 2017-18 या आर्थिक वर्षांसाठी आत्ता पर्यंत एकूण 47 हजार 844 कोटी रूपयांची नुकसानभरपाई राज्यांना अदा करण्यात आली आहे असेही सरकारचे म्हणणे आहे.