breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

लिपिकापुढे आयुक्तांची स्पशेल शरणागती ; ‘त्या’ कर्मचा-यांची बदली स्थगित 

आयुक्त, प्रशासन विभागाची दुटप्पी भूमिका

पिंपरी –  पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डिकरांना दोन लिपिकापुढे स्पशेल शरणागती पत्करावी लागली आहे. आयुक्तांच्या आदेशानूसार विविध विभागातील नऊ लिपिकाच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. परंतू, त्यातील सात लिपिकांनी बदलीच्या ठिकाणी रुजू झाले. मात्र, दोन लिपिकांनी आयुक्तांचा आदेश फाट्यावर मारत त्याच्या आदेशाला थेट केराची टोपली दाखविली. बदली होवून तब्बल महिनाभरानंतर ते बदलीच्या ठिकाणी रुजू झालेच नाहीत. अखेर त्या दोन लिपिकांची बदलीस आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी स्थगिती दिली आहे. त्यामुळे लिपिकापुढे आयुक्तांनी चक्क लोटागंण दाखल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरु आहे.  

पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने आयुक्तांच्या आदेशाने नऊ कर्मचा-यांच्या बदल्या महिन्यापूर्वी केल्या होत्या. त्यापैकी शिक्षण विभागातील लिपिक अविनाश ढमाले व करसंलकलन विभागातील लिपिक चेतन फाकटकर हे दोघेच बदलीच्या ठिकाणी रुजू झाले नाहीत. बदलीचा आदेश जुगारून कर्मचा-यांनी आयुक्त व प्रशासनाला आव्हान दिले.  आदेश न पाळणा-या कर्मचा-यांची अखेर महिन्यानंतर बदली स्थगित करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे.

महापालिका शिक्षण विभागातील कर्मचा-याची बदली थांबविसाठी बड्या राजकीय व्यक्तींकडून प्रशासनावर दबाव टाकल्याचे  बोलले जात होते. त्यानुसार प्रशासनामार्फत बदल्या स्थगित करण्यात आल्या. मात्र, यावरून आयुक्त व प्रशासनाचा दुटप्पीपणा उघड झाला आहे. काही दिवसांपूर्वी ई प्रभागातील शितल चर्तुवेदी यांची सहशहर अभियंता आय्युब खान पठाण यांनी बदली केली. त्यांना बदलीचा अधिकार नसताना राजकीय दबावातून बदली केली जात असल्याची तक्रार कर्मचारी महिलेने आयुक्तांकड़े केली होती. महिलेच्या तक्रारीची दखल घेण्याऐवजी चुकीच्या पध्दतीने झालेल्या बदलीचा आदेश पाळला नाही. म्हणून, या महिलेचे निलंबन प्रशासनामार्फत करण्यात आले.

या प्रकारावरून कर्मचारी महिलेला वेगळा न्याय व शिक्षण विभागातील टेंडर लिपिकाला वेगळा न्याय, अशी दुटप्पीपणाची भूमिका समोर आली आहे. राजकीय दबावाला बळी पडून आयुक्तांकडून व प्रशासनाकडून झालेला हा प्रकार पालिका वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button