breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

शांताराम (बापू) भालेकर यांना रिलीफ सोशल फांऊडेशनतर्फे ‘कोरोना योद्ध्याचा मान

जागतिक कोरोना संकटाच्या काळात नागरिकांसाठी नि:स्वार्थीपणाने सेवा करणारे माजी नगरसेवक शांताराम कोंडिबा भालेकर यांच्या कामाचे सर्वांकडून कौतूक करण्यात येत आहे. शांताराम भालेकर यांनी तळवडे-रुपीनगर, सहयोगनगर, त्रिवेणीनगर परिसरात केलेल्या सामाजिक कार्याची रिलीफ सोशल फांऊडेशन तर्फे आवर्जून दखलं घेण्यात आली आहे.

सध्या कोरोना काळात शांताराम भालेकर हे कोरोना योद्धा म्हणून सामिजिक बांधिलकी जपत, तसेच कोणताही साजकिय पक्षपात न करता, कोणताही भेद-भाव न करता नागरिकांसाठी मदत करत आहेत. भालेकर यांच्या कामाचे सर्वत्र कौतूक होत आहे. त्यांच्या या कार्याची रिलीफ सोशल फांऊडेशन या सामाजिक संघटनेतर्फे दखलं घेण्यात आली आणि त्यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार देखील करण्यात आला.

या सत्कार प्रसंगी फांऊडेशनचे अध्यक्ष समिर मुल्ला, उपाध्यक्ष समिर शेख, फांऊडेशनचा आधारस्तंभ जावेद पठाण तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक रमेश भालेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button