breaking-newsमहाराष्ट्र

लहान भावाचा अपघाती मृत्यू; धक्क्याने मोठ्या भावाचाही दुर्दैवी मृत्यू

लहान भावाचा अपघाती मृत्यू झाल्याने धक्का बसलेल्या मोठ्या भावाचेही निधन झाल्याची घटना अहमदनगरमध्ये घडली. या घटनेमुळे चिंचोली या गावात शोककळा पसरली आहे.

नेवासे तालुक्यातील चिंचोली येथे राहणारे शेतकरी पोपट चावरे (वय ५०) यांचा मुलगा शुभम चावरे (वय १९) याचा दोन दिवसांपूर्वी महाविद्यालयात मृत्यू झाला. महाविद्यालयात पायऱ्या चढताना तो पडला आणि यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तोवर त्याचा मृत्यू झाला होता. शुभम हा व्यवस्थापन शाखेत शिक्षण घेत होता.

शुभमच्या मृत्यूचे वृत्त त्याचा मोठा सचिन चावरे (वय २१) याला समजले. काही वेळातच सचिनला अस्वस्थ वाटू लागले. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचेही निधन झाले. एकाच दिवशी दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्याने चावरे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, एक विवाहित व एक लहान बहीण असा परिवार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button