डिजिटल माध्यमे केंद्राच्या प्रसारण मंत्रालय अख्यतारीत येणार
मुंबई – डिजिटल माध्यमावर अंकुश लावण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या अंतर्गत डिजिटल माध्यमांचे नियंत्रण आता माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अख्यत्यारीत येणार आहे. केंद्र सरकारने या संदर्भात निर्णय जारी केला आहे. ऑनलाईन चित्रपट, ऑ़डिओ, व्हिज्यूअल्स, ऑनलाइन बातम्या, चालू घडामोडींवरची ऑनलाईन बातम्यातील कंटेंट हे सर्वांचे नियंत्रण आता माहिती प्रसारण खात्याकडे येणार आहे.
केंद्र सरकारचा हा आदेश तात्काळ प्रभावाने लागू झाला आहे. गेल्या काही वर्षांपासून अनियंत्रित असलेल्या डिजिटल माध्यमावर अंकुश लावण्याची मागणी होत होती. डिजिटल माध्यमे फोफावल्यामुळे फेक न्यूजचे प्रकार वाढायला लागले होते. इलेक्ट्रॉनिक माध्यम नियंत्रित करण्याची गरज नाही अशी भूमिका केंद्र सरकारने हायकोर्टात मांडली असताना, दुसरीकडे मात्र डिजिटल माध्यमे नियंत्रणाचा सरकारचा अट्टाहास का आहे असाही प्रश्न विचारला जातोय.