breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

लवकरच बाजारात येणार २० रुपयांचे नाणे

मुंबई : भारतीय चलनात आणि बाजारात आता आणखीन एक नवे नाणे येण्याच्या तयारीत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून २० रुपयांच्या नाण्याची निर्मिती केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता लवकरच २० रुपयांचं नाणं चलनात दिसणार आहे.

२० रुपयांच्या या नाण्याची डिझाईन आणि थीम दोन्ही वेगळे असणार आहेत. हे नाणे दोन धातुंपासून बनवण्यात येणार आहे. या नाण्याच्या डिझाईनवर काम सुरु झालं असून डिसेंबर २०१८ पर्यंत हे नाणे बाजारात लॉन्च केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सध्या देशाच्या अर्थव्यवस्थेत जवळपास २६ हजार कोटी रुपयांची नाणी चलनात आहेत. दहा रुपयांच्या नोटांची छपाई मर्यादित आहे आणि वीस रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली आहे. बाजारात १० आणि २० रुपयांच्या जुन्या नोटा अधिक आहेत. भारतीय चलनात सध्या जवळपास ८० हजार कोटी रुपये किमतीच्या पाच ते वीस रुपये मुल्याच्या ५७ अरब नोटा आहेत.

आरबीआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशभरात सध्या ५० हजार कोटी रुपयांहून अधिक दहा आणि वीस रुपयांच्या नोटा असल्याचा आकडा फुगवून सांगितला जातो. नोटा अधिकाधीक पाच वर्षापर्यंत चांगल्या राहतात असे मानले जाते. तर, नाणी नेहमीच दिर्घकाळ चालतात. नोटा ठराविक काळानंतर खराब होणार म्हणून अधिक काळ टिकणारी नाणी चलनात आणली जात आहेत. त्यामुळेच आता २० रुपयांचे नाणे चलनात आणण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button