breaking-newsपिंपरी / चिंचवड

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

पिंपरी – लग्नाचे आमिष दाखवून एका इसमाने महिलेसोबत वारंवार शरीरसंबंध प्रस्थापीत केले. तसेच तिच्या घरच्यांना संबंधाबद्दल सांगण्याची धमकी देऊन तिच्या बँकेतील एफडीवर ७० हजारांचे कर्ज घेतले. आणि २० तोळे सोन्याचे दागिने देखील घेऊन फसवणुक केली. ही घटना २०१३ ते २०१८ या कालावधीत पिंपरी गावात घडली.

याप्रकरणी पीडित ४० वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.२५) तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, आरोपी राजेंद्र पर्वत ठाकरे (वय ५२, रा. शिवदत्तनगर, सायकरचाळ, नवमहाराष्ट्र शाळेसमोर, पिंपरीगाव) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०१३ ते २०१८ दरम्यान आरोपी राजेंद्र याने महिलेला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी शरीरसंबंध प्रस्थापीत केले. त्यानंतर महिलेच्या बँकेतील १ लाखांच्या एफडीवर ७० हजारांचे कर्ज घेतले. तसेच महिलेचे २० तोळे सोने देखील घेऊन ते परत केले नाही. आणि कोणाला काही सांगितल्यास आपल्या संबंधाबद्दल घरच्यांना सांगण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी राजेंद्र याला अटक केली आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक यु.पी.देशमुख अधिक तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button