breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

रेल्वेने डिसेंबरमध्ये मालवाहतुकीतून मिळवले तब्बल 11,778 कोटी

नवी दिल्ली – कोरोना लॉकडाऊनचा प्रवासी वाहतुकीवर परिणाम झाला असला तरी भारतीय रेल्वेने त्याची कसर माल वाहतुकीतून भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात डिसेंबर 2020 मध्ये रेल्वेने 118.13 दशलक्ष टन मालवाहतूक केली. गेल्या वर्षीच्या डिसेंबरपेक्षा ती 8.54 टक्के जास्त आहे. त्यातून रेल्वेला 11,788.11 कोटींचे उत्पन्न मिळाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत ते 757.74 कोटी जास्त आहे.

वाचा :-दोन्ही लसी 110 टक्के सुरक्षित, डीसीजीआयचे संचालकांचा विश्वास

कोरोना काळात रोडावलेली प्रवाशी संख्या लक्षात घेऊन आणि कोरोनाला संधी मानून रेल्वेने कार्यक्षमतेत आणि कामगिरीत सुधारणा केली. या काळात जास्तीत जास्त मालवाहतूकीवर भर दिला. उद्योजकांना मालवाहतूकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी सरकारनेही रेल्वेला सवलती दिल्या. त्याचा पुरेपूर फायदा उठवत रेल्वेने शून्याधारित वेळापत्रकानुसार मालवाहतूक केली. त्यात डिसेंबरमध्ये 11,788.11 कोटींचे उत्पन्न मिळवले. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये रेल्वेला मालवाहतुकीतून 11,030.37 कोटींचे उत्पन्न मिळाले होते. त्याच्या तुलनेत यंदा 6.87 टक्के अधिक उत्पन्न मिळाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button