breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 19,42,136 वर

  • मुंबईत 581, पुण्यात 543 नवे रुग्ण

मुंबई – रविवारी दिवसभरात आढळलेल्या 3,282 नव्या कोरोना रुग्णांमुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 19,42,136 वर पोहोचली आहे. तर एका दिवसात 2,064 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने आणि 35 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्याने राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 18,36,999 इतकी झाली असून कोरोनाबळींचा आकडा 49,666 वर पोहोचला आहे. तर सध्या 54,317 रुग्ण उपचार घेत आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई आणि पुण्याला बसला आहे. मुंबईत रविवारी कोरोनाचे 581 नवे रुग्ण आढळले, तर 3 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या 2,95,240 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 11,135 इतका झाला आहे. तसेच काल 697 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने मुंबईत आतापर्यंत 2,75,464 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या 7,771 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

त्याचबरोबर सुरुवातीला दररोज 2 हजारांहून अधिक रुग्ण आढळणाऱ्या पुणे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून दिवसभरातील नव्या रुग्णांच्या संख्येत प्रचंड घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात पुण्यात 543 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर 10 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यासह पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 3,64,696 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 8,844 इतका झाला आहे. दरम्यान, काल आढळलेल्या 543 नव्या रुग्णांपैकी पुणे शहरातील 290, पिंपरी-चिंचवडमधील 109 आणि पुणे ग्रामीण भागातील 100 रुग्णांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button