breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविणा-यांना करात सवलत द्या – संदीप वाघेरे

पिंपरी, (महाईन्यूज) – वसई-विरार महापालिकेप्रमाणे पिंपरी-चिंचवड महापालिकेने देखील सौर ऊर्जा आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविणा-या मिळकतधारकांना मिळकतकरात सवलत द्यावी, अशी मागणी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

आयुक्त हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात नगरसेवक संदीप वाघेरे यांनी म्हटले आहे की, मागील चार-पाच वर्षापासून राज्यातील जनतेला दुष्काळामुळे पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील पाणी पुरवठा देखील मागील तीन महिन्यांपासून दिवसाआड करण्यात आला आहे. दुष्काळामुळे राज्यातील वीज उत्पादन कमी होत आहे. यावर मात करण्यासाठी शहरी भागात जर सौर ऊर्जा व रेन वॉटर हार्वेस्टींग प्रकल्पांना महापालिकेने प्रोत्साहन दिले तर शहरात विकसित होणा-या मोठ्या सोसायट्या हे प्रकल्प राबवतील, असेही संदीप वाघेरे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button