breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशाचा जीव वाचवणाऱ्या गँगमनला रेल्वेची धडक

प्रवाशाला रेल्वे अपघातातून वाचवणे एक गँगमनला चांगलेच महागात पडले आहे. प्रवाशाचा शॉर्टकट गँगमनच्या जीवावर बेतले आहे. चंद्रकांत मद्रे (वय ५४) असे या गँगमनचे नाव असून ते पश्चिम रेल्वेत कार्यरत आहेत. हा अपघात शनिवारी सकाळी अंधेरी येथे घडला. लोकलने धडक दिल्यामुळे मद्रे हे स्वत: गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मद्रे यांच्या एका बाजूच्या खांद्याला मोठी दुखापत झाली आहे.

शनिवारी सकाळी ९.३० च्या सुमारास अंधेरी व जोगेश्वरी स्थानकादरम्यान दुरांतो एक्स्प्रेस थांबली होती. यातील एका प्रवासी रेल्वे ट्रॅकवर उतरुन चालू लागला. त्याच्या हातात अनेक बॅगा व सामान होते. त्याला कळवा ब्रीजकडे जायचे होते. त्याचवेळी मद्रे हे आपल्या इतर सहकाऱ्यांबरोबर ट्रॅकच्या देखभाल दुरुस्तीसाठी जात होते. रेल्वे ट्रॅक ओलांडताना तो प्रवासी फक्त एका दिशेला पाहत होता. गर्दीची वेळ असल्यामुळे दोन्ही बाजूने रेल्वेची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरु होती. तो प्रवासी संकटात असल्याचे मद्रे यांच्या लक्षात आले. त्यांनी त्याला हाक मारुन दक्ष करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचे लक्ष नव्हते. अखेर स्लो लाइनवर मद्रे यांनी त्याला थांबवले. परंतु, या नादात मद्रे यांनी स्वत:च्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केले. आपल्या सहकाऱ्यांकडे जाण्यासाठी ते वळले. त्याचवेळी लोकलने त्यांना धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. यात त्यांचा एक खांदा निखळला.

मोटरमनने लगेच लोकल थांबवली. इतर गँगमनने मद्रे यांना उचलून मोटरमन केबिनमध्ये ठेवले. अंधेरी रेल्वे स्थानकावरुन त्यांना कूपूर रग्णालयात उपचारासाठी नेले.

मद्रे यांना या आजारातून बरे होण्यासाठी आणखी २ वर्षे लागण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली असून भविष्यात ते जड सामान उचलू शकतील की नाही, याबाबत ही अनिश्चितता आहे. अपघातादिवशी काय-काय घडल हे मद्रे यांच्या आता काहीच लक्षात नाही.  मद्रे यांच्यावर शस्त्रक्रियेची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

मद्रे हे आपल्या पत्नी व दोन मुलांसह राहतात. मुलगा २४ वर्षांचा असून तो वर्सोवा येथे एका ठिकाणी काम करतो. तर १२ वर्षांची मुलगी शिकत आहे. मद्रे यांच्या मुलाने संताप व्यक्त केला असून ज्या व्यक्तीसाठी वडिलांनी धोका पत्करला व स्वत:चा जीव धोक्यात घालून त्याला वाचवले. त्याने अपघातानंतर वडिलांना पाहिलेही नाही किंवा त्यांच्या प्रकृतीची चौकशीही केली नाही. वडिलांना वेदना असह्य होत आहेत. त्यांना त्या दिवशीचे काहीच आठवत नसल्याची माहिती त्याने दिली. दरम्यान, रेल्वे विभागाने मद्रे यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर प्रवशांनी  रेल्वे ट्रॅक पार करण्याचा धोका पत्कारु नये असे आवाहनही केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button