breaking-newsक्रिडाताज्या घडामोडीपुणे

रुस्तुम ए हिंद हरिश्चंद्र बिराजदार फाऊंडेशन मानधनधारक ‘हे पाच’ मल्ल ठरले पदकविजेते

महाराष्ट्र केसरी स्पर्धेत गरुड भरारी; पाचपैकी तिघांना सुवर्णपदक

पुणे । महाईन्यूज । प्रतिनिधी

पुण्यातील रुस्तुम ए हिंद हरिश्चंद्र बिराजदार स्पोर्ट्स फाऊंडेशनचे मानधनधारक मल्लांनी नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत गरुड भरारी मारली आहे.

रुस्तुम ए हिंद हरिश्चंद्र बिराजदार स्पोर्ट्स फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थेच्या मानधनधारक पैलवानांनी  ३ सुवर्णपदकासह १ रौप्य व १ कांस्यपदक मिळवले आहे.

पदकविजेते मल्ल कोण आहेत?

पै. ज्योतिबा आटकळे : ५७ किलो गादी विभाग : सुवर्णपदक

पै. आबा आटकळे :  ५७ किलो माती विभाग : सुवर्णपदक

पै. रामचंद्र कांबळे :  ७९ किलो गादी विभाग : सुवर्णपदक

पै. निखिल कदम : ६१ किलो माती विभाग : रोप्यपदक

पै. सौरभ पाटील ६१ किलो गादी विभाग : कांस्यपदक.

***

का झाली रुस्तुम ए हिंद हरिश्चंद्र बिराजदार संस्थेची स्थापना?

हरिश्चंद्र बिराजदार यांनी महाराष्ट्राला आंतरराष्ट्रीय स्तरावरील पदकांचे स्वप्न दाखवले व आपल्या शिष्यांच्या माध्यमातून ते पूर्ण करण्याचा आजन्म प्रयत्न केला.त्यांच्या अनेक शिष्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध मानाच्या स्पर्धेत भारत देशाला पदके मिळवून देऊन भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे केले.मामांच्या आकस्मित जाण्याने कुस्तीक्षेत्रात फार मोठी पोकळी पडली. मात्र, मामांच्या शिष्याने जागतिक, राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता पै.राहुल आवारे यांनी त्यांना विचाराने जिवंत ठेवण्याच्या उद्देशाने “रुस्तुम ए हिंद हरिश्चंद्र बिराजदार” संस्थेची स्थापना करत महाराष्ट्रातील प्रतिभावंत व गरजू मुलांना मानधन सुरू केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button