breaking-newsमुंबई

रिलायन्स कंपनी कार्यालयावर ‘राफेर चोर’ची झळकली पोस्टर

मुंबई : मुंबईतील सांताक्रूझमधील अनिल अंबानीच्या रिलायन्स कंपनी कार्यालयावर त्यांचा ‘राफेल चोर’ असा उल्लेख असल्याची पोस्टरबाजी करण्यात आली आहे. या पोस्टरवर अनिल अंबानी यांच्या फोटोसह राफेल विमानाचा फोटो दाखवत ‘राफेल चोर’ असा उल्लेख करत त्यावर मुंबई काँग्रेस असे लिहले आहे.

दरम्यान, रविवारी सकाळी कंपनीच्या सुरक्षारक्षकांच्या ही बाब लक्षात येताच ही पोस्टर्स काढून टाकण्यात टाकली. राफेल प्रकरणात सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करण्यास नकार दिल्यानंतर काँग्रेसने हे प्रकरण लावून धरणार असल्याचे संकेत या पोस्टरद्वारे दिले आहेत. तसेच बोफोर्स प्रकरण ज्याप्रमाणे लोकांत नेले गेले होते तसेच राफेल घोटाळा प्रकरणही आता जनतेच्या दरबारात घेऊन जाण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून सुरू झाल्याचे मानले जात आहे. त्याचाच भाग म्हणून मुंबई काँग्रेसकडून ही पोस्टरबाजी झाली आहे.

राफेल प्रकरणात सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता. तसेच याबाबत निकाल देताना कोर्टाने म्हटले होते की, राफेल विमान किंमतीबाबत कॅगकडे तपशील दिला आहे. तसेच त्याचा अहवाल संसदेत सादर केला असून तो लोकलेखा समितीकडूनही तपासण्यात आला आहे, त्यामुळे सरकारने खरेदी प्रक्रिया रीतसर राबविल्याने आम्ही त्यात हस्तक्षेप करणार नाही असे कोर्टाने म्हटले होते.

मात्र, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि लोकलेखा समितीचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी सरकार चुकीची माहित देत असून सुप्रीम कोर्टाचीही फसवणूक करत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मोदी सरकारने 24 तासाच्या आता यू-टर्न घेत निकालातील चुकीचा उल्लेख बदलण्यासाठी अर्ज केला आहे. यामुळे मोदी सरकारची नाचक्की झाली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button