breaking-newsताज्या घडामोडीपुणे

राहूल गांधी पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद

पुणे – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी पुण्यातील विद्यार्थ्यांशी उद्या, शुक्रवारी (५ एप्रिल) संवाद साधणार आहेत. हडपसर येथील लक्ष्मी लॉन्स येथे सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

आगामी निवडणुकीत तरुण मतदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य युवकांच्या हाती आहे. त्यामुळे काँग्रेसकडून युवकांशी संवाद साधण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीनिमित्त राहुल गांधी पुणे दौऱ्यावर येत आहेत. युवा सुराज्य प्रतिष्ठान आणि नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडियातर्फे (एनएसयूआय) आयोजित या कार्यक्रमात केवळ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे, अशी माहिती युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार विश्वजित कदम यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी ‘एनएसयूआय’चे प्रदेशाध्यक्ष आमिर शेख उपस्थित होते. या दौऱ्यादरम्यान राहुल गांधी पुण्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनादेखील भेटणार आहेत, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button