breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

‘संपेल शास्तीकर, बटन शिट्टीचा दाबाल जर’ : राहुल कलाटे

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांची प्रचार गीते मतदारांची लक्ष वेधून घेत आहेत. ही प्रचार गीते मतदारांकडून व्हॉट्सअॅपवर स्टेट्स ठेवण्यात येत आहेत. नव मतदार युवा वर्गाचा आयकॉन म्हणून राहुल कलाटे यांच्याकडे पाहत आहे. कलाटे यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली असून मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. ‘संपेल शास्तीकर, बटन शिट्टीचा दाबाल जर’ असे विविध प्रश्न सोडविण्याची ग्वाही देत ‘ना कुठला पक्ष, ना कुठला नेता, माझा आधार फक्त मायबाप जनता’ अशी साद कलाटे हे मतदारांना घालत आहेत.

चिंचवड विधानसभेची निवडणूक राहुल कलाटे शिट्टी चिन्हावर लढत आहेत. कलाटे यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. दिवसेंदिवस कलाटे यांना मतदारांचा पाठिंबा वाढत आहे. चिंचवडमधील जनता कलाटे यांच्याकडे आश्वासक नेतृत्व म्हणून पाहत आहे. वेगवेगळ्या संकल्पांनांच्या माध्यमातून राहुल कलाटे मतदारांपर्यंत पोहोचत आहे. त्यांची प्रचार गीते सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. संपूर्ण चिंचवडमध्ये या प्रचार गीतांचीच चर्चा असून मतदारांकडून ही प्रचार गीते व्हॉट्सअॅप स्टेट्स ठेवत कलाटे यांना समर्थन दिले जात आहे.

”चिंचवडमध्ये आम्ही शिट्टी निवडणार, राहुलदादांना आमदार करणार”, ”वारसा आहे त्यांचा समाजसेवेचा, विकासाचे त्यांनाच आहे व्हिजन”…”आले आले राहुल कलाटे, शिट्टीचा आता नाद घुमे”, ”आले राहुलदादा त्यांचा बोलबाला, युवा आमदार विधानसभेत जाणार”, ”दररोज पाणी मिळेल. वाहतूक कोंडी सुटेल. विकास गंगा आता येईल दारी, आले आले राहुलदादा आता जोमात, शिट्टी समोरचे बटन दाबा झटक्यात”… ”विकास कामे बघून सारे होतील, दंग युवा आमदार सोडवेल प्रश्न, जनहितासाठी राहुलदादा आहेत हट्टी, निवडवायचे त्यांचे चिन्ह शिट्टी, 26 फेब्रुवारी तारीख लक्षात ठेवा राहुलदादा आमदार होणार ओ….
”एकजुटीने आता लढायचे, चिंचवडचे हित आता पहायचे..राहुलदादाला आमदार करायचे”, ”शिट्टीसमोरचे बटन दाबायचे…युवा नेते आहे, खास विकासाचा त्यांना ध्यास…समाजसेवेचा वारसा कलाटेंच्या कामाचा ठसा…दादा म्हणजे आत्मविश्वास…जनहिताची त्यांना आस….पिण्यास मिळेल पाणी, सुटेल वाहतूक कोंडी…कच-याचे करु व्यवस्थापन ऑक्सीजन पार्कचे वचन…शिक्षण मिळेल दर्जेदार, युवकांना स्वयंरोजगार…चिंचवडची निवडणूक निश्चितच वेगळी आहे. प्राप्त परिस्थितीत राहुल कलाटे हेच जनतेच्या मनातील आमदार हीच लोकांची भावना आहे. काम करणारा माणूस म्हणजे राहुल कलाटे, जे बोलले ते करणार अशी ज्यांची ख्याती…राहुल कलाटेच करतील चिंचवडची प्रगती…ही प्रचार गीते मतदारांचे लक्ष वेधून घेत आहेत.

दरम्यान, राहुल कलाटे यांनी रावेत पुनावळे रहाटणी येथे मतदारांच्या गाठीभेटी तसेच बैठका घेतल्या. पिंपळे निलख परिसरात पदयात्रा काढली. या पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button