breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

रिझर्व बॅंकेकडून व्याजदरात वाढ

  • घर, वाहनासाठीच्या कर्जावरील व्याजदर वाढणार

मुंबई – महागाई आणखीन वाढण्याची शक्‍यता असल्यामुळे रिझर्व बॅंकेने आपल्या व्याजदरात म्हणजे रेपो रेटमध्ये पाव टक्‍क्‍यांची वाढ केली आहे. दोनच महिन्यांपूर्वी रिझर्व बॅंकेने रेपो दरामध्ये पाव टक्का वाढ केली होती. त्यात आता पुन्हा तेवढीच भर पडली आहे. त्यामुळे घर, वाहन आणि इतर कर्जांवरील व्याजदर तेवढ्याच प्रमाणात वाढण्याची शक्‍यता आहे. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे या कार्यवाहीमुळे महागाई आणखी वाढण्याची शक्‍यता कमी आहे व नजीकच्या भविष्यात व्याजदर वाढवण्याची गरज भासणार नाही, असे रिझर्व बॅंकेने म्हटले आहे. निर्णयानंतर रिझर्व बॅंकेचा रेपो रेट 6.5 टक्के झाला. या दराने रिझर्व बॅंक इतर बॅंकांना लघुमुदतीचे कर्ज देत असते. त्याचबरोबर रिव्हर्स रेपो दर 6.25 टक्के करण्यात आला. या दराने रिझर्व बॅंक इतरेअ बॅंकांकडून कमीमुदतईच्क्ष्या ठेवी स्वीकारत असते.

पतधोरणानंतर बोलताना रिझर्व बॅंकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी सांगितले की महागाईत वाढ होऊ शकणाऱ्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे आगोदरच 5 टक्‍क्‍यांच्यापुढे असलेली महागाई रोखण्यासाठी व्याजदरवाढ करण्याशिवाय पर्याय नव्हता. रिझर्व बॅंकेचे मुख्य काम महागाई नियंत्रणात ठेवणे आहे. त्यामुळे पतधोरण समितीच्या 6 पैकी 5 सदस्यांनी व्याजदरवाढीच्या बाजूने मतदान केले.

केंद्र सरकारने सर्व खरीप पिकांच्या आधारभूत किंमतीत वाढ केली आहे. अनेक राज्यांनी वेतन आगोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी करायचे ठरवले आहे. क्रूडचे दर 70 डॉलर प्रति पिंपाच्यावर आहेत. त्याचबरोबर जागतिक आर्थिक अनिश्‍चितता आणि व्यापार युद्धामुळे रुपयाचे मूल्य 8 टक्‍क्‍यांनी कमी झाले आहे. अमेरिका आणि इतर देशांत व्याजदरवाढ चालू आहे. या सर्व कारणांमुळे महागाई वाढण्याची शक्‍यता आहे.

रिझर्व बॅंकेने केलेल्या व्याजदरवाढीवर उद्योजकांनी त्यातल्या त्यात “रिऍल्टी’ क्षेत्रातील उद्योजकांनी तीव्र नापसंती व्यक्‍त केली आहे. नोटाबंदी आणि जीएसटीच्या प्रभावातून अर्थव्यवस्था बाहेर निघण्याची शक्‍यता वाढली असतानाच रिझर्व बॅंकेने व्याजदरवाढीच्या माध्यमातून भांडवल महाग करून टाकले आहे. त्यामुळे उद्योगांकडून भांडवलाचा वापर कमी होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button