breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अर्धांगवायूचा झटका आला नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका – अमोल मिटकरी

अकोला – राष्ट्रवादी काँग्रेसच्या साहित्य कला चित्रपट विभागाच्या विदर्भ अध्यक्षा महागायिका वैशाली माडे सोमवारी अकोला दौऱ्यावर होत्या. पक्षाच्या वतीने वैशाली माडे यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अमोल मिटकरी यांच्यासह राष्ट्रवादीचे इतर काही नेते देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात अमोल मिटकरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. त्यानंतर शेवटी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची छक्कड खड्या आवाजात गायला सुरुवात केली.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची छक्कड गात असताना अमोल मिटकरी यांचा आवाज चिरका व्हायला लागला, तोंड किंचित वाकडे होत असल्याची जाणीव उपस्थित असणाऱ्या काही जणांना झाली. त्यानंतर काही जणांनी त्यांच्याकडे धाव घेतली. मिटकरी यांच्या प्रकृतीत झालेला बदल उपस्थितांच्या लक्षात येताच उपस्थितांनी तातडीने मिटकरी यांना आयकॉन रूग्णालयात दाखल केलं. त्यानंतर आज त्यांनी ट्विट करत त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे.

आपल्या सर्वांच्या शुभेच्छा व आशीर्वादामुळे मी एकदम ठणठणीत असून सोशल मीडियामधून येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये. मला कुठलाही अर्धांगवायूचा झटका वगैरे आला नाही. माझी प्रकृती उत्तम असून सध्या अकोला येथील आयकॉन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. लवकरच जनसेवेत रुजू होईल, असं ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं आहे.

दरम्यान, अमोल मिटकरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केल्यानंतर ‘माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या मनाची होतीया काहीली’ ही छक्कड गात होते. मिटकरींना लहानपणापासून भजन कीर्तन यात रस आहे. तर अकोल्यात शिवव्याख्याते म्हणून त्यांचा लौकिकही वाढली आहे. तर या भागात ते राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक देखील आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button