breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

रिझर्व्ह बँक : नागरी सहकारी बँकांमध्ये २२० कोटी रुपयांचे घोटाळे

महाईन्यूज |

पंजाब अँड महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेतील घोटाळ्यांनी ठेवीदार, खातेदार धास्तावलेले असताना देशातील नागरी सहकारी बँकांची आणखी एक धक्कादायक बाब समोर आलेली आहे. देशभरातील नागरी सहकारी बँकांमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये २२० कोटी रूपयांचे घोटाळे झाले आहेत. आणखी धक्का देणारी माहिती अशी की २०१८ -२०१९ या एका वर्षात १८१ घोटाळे झाले आणि ते होते तब्बल १२७.७ कोटी रुपयांचे. माहिती अधिकाराखाली पीटीआय या वृत्तसंस्थेने विचारलेल्या माहितीमध्ये रिझर्व्ह बँकेनेच हा खुलासा केलेला आहे. रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार, देशभरात तब्बल एक हजारांवर घोटाळे झाले आहेत. २०१७-१८ या वर्षात ९९ प्रकरणांमध्ये ४६.९ कोटींचे घोटाळे झाले आहेत तर २०१६-१७ साली २७ प्रकरणांमध्ये ९.३ कोटी रूपयांचे घोटाळे झालेले आहेत.

  • कोणत्या वर्षी किती झाले घोटाळे आणि त्या घोटाळ्यातील एकूण रक्कम किती होती?

वर्ष घोटाळे रक्कम
२०१८-१९ १८१ १२७.७ कोटी
२०१७-१८ ९९ ४६.९ कोटी
२०१६-१७ २७ ९.३ कोटी
२०१५-१६ १८७ १७.३ कोटी
२०१४-१५ ४७८ १९.८ कोटी रुपये

२०१५-१६ या वर्षात १८७ प्रकरणांमध्ये १७.३ कोटी रूपयांचा घोटाळा झाला आहे. तर २०१४-१५ या साली तब्बल ४७८ घोटाळे झाले आहेत. त्यात १९.८ कोटी रुपयांची अफरातफर करण्यात आली आहे. २०१४-१५ ते २०१८-१९ या पाच वर्षांच्या काळात तब्बल ९७२ घोटाळे झाल्याचा धक्कादायक खुलासा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केल्याचे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेले आहे. या घोटाळ्यांमध्ये २२१ कोटी रुपयांची अफरातफर झालेली आहे. या घोटाळ्यांबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणते की, ”ज्या बँकांमध्ये हे घोटाळे झाले आहेत त्यांनी तपास संस्थांकडे फौजदारी गुन्हे दाखल करायला हवे. तसेच घोटाळ्यांमध्ये सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अंतर्गत प्रक्रियद्वारे कारवाई करावी. शिवाय कर्मचाऱ्यांच्या जबाबदारीबद्दल लक्ष घालायला हवे आहे.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button