breaking-newsमहाराष्ट्र

रिक्षाचालकाची पत्नी नगरसेवक झाल्याच्या आनंदात दिवसभर मोफत प्रवास!

नगर – महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३ मधून रिक्षाचालक फारुक शेख यांच्या पत्नी रिजवाना शेख विजयी झाल्या. त्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार होत्या, त्यांना २ हजार २४३ मते मिळाली. काल, सोमवारी त्या विजयी झाल्याबद्दल आज, मंगळवारी मुकुंदनगर रिक्षा थांब्यावरील रिक्षाचालकांनी सर्व नागरिकांसाठी मोफत प्रवासाची सोय केली होती. एका रिक्षाचालकाची पत्नी नगरसेवक झाल्याचा आनंदोत्सव या थांब्यावरील सर्व रिक्षाचालकांनी अशा आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा केला.

आज दिवसभर मंगळवार बाजारसाठी मुकुंदनगर येथून शहरातील मंगलगेटला येणाऱ्या व जाणाऱ्या नागरिकांसाठी हा मोफत प्रवास उपलब्ध करून प्रवाशांना पेढेही वाटण्यात आले. सर्वसामान्य उमेदवार निवडून आल्याचा हा वेगळा आनंदोत्सव नगरकरांना पाहावयास मिळाला. दिवसभर रिक्षाचा मोफत प्रवास हा चर्चेचा विषय बनला होता. रिक्षा थांबा संघटनेचे अध्यक्ष तौसिफ शेख, मोहसीन शेख, फईम शेख, साजिद सय्यद, आतिक शेख, रफिक पठाण, रिजवान सय्यद, आसिफ पठाण, आतिक शेख, आदिल शेख, पप्पू शेख, मुन्ना खान, नूर सय्यद, याकुब सय्यद आदींसह रिक्षाचालकांनी पेढे वाटत प्रवाशांनाही आपल्या आनंदात सहभागी करून घेतले. रिक्षाचालकाची पत्नी निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार असल्याचे समजल्यानंतर मुकुंदनगर रिक्षा थांब्यावरील चालक प्रचारातही सहभागी झाले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button