breaking-newsपिंपरी / चिंचवड

राहुल पगारिया यांचे सत्कार्य, प्लाज्मा दान करून समाजापुढे निर्माण केला आदर्श

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडमध्ये कोविड 19 चा हाहाकार असतानाच या विषाणुची लागण झालेल्या रुग्णांसाठी प्लाज्मा दान करणा-यांची खरी आवश्यक निर्माण झाली आहे. कोरोना विषाणुची बाधा झालेले रुग्ण बरे व्हावेत, यासाठी राहुल पगारिया यांनी प्लाज्मा दान करून समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या मुलाने सुध्दा प्लाज्म दान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

राहुल पगारिया यांनी प्लाज्मा दान करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर संत तुकारामनगर प्रभागातील राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुलक्षणा धर यांनी वायसीएम रुग्णालयाशी संपर्क साधून चर्चा केली. त्यावर वायसीएम रुग्णालयाच्या ब्लड बॅंकेत त्यांनी आज प्लाज्मा दान केला. पगारिया यांनी या सत्कार्यातून समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

राहूल पगारिया यांच्यासारख्या कोरोना योद्ध्यांनी पुढे येऊन प्लाज्मा दान करावा. असे केल्यास कोरोनाविरुद्धची लढाई आपण लवकर जिंकू शकू. त्यांच्या कार्याचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. समाजातील अशा तरुणांनी प्लाज्मा दान करण्यासाठी पुढाकार घ्यावा.

सुलक्षणा धर, नगरसेविका, संत तुकारामनगर

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button