breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

राहुल गांधींची नवी टॅगलाईन ‘गायब हो गया’

मुंबई – राफेल विमान खरेदी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले मित्र उद्योगपती अनिल अंबानी यांना ३० हजार कोटींचे कंत्राट दिल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘चौकीदार चोर है’ अशी टॅगलाईन वापरली होती. ‘चौकीदार चोर है’च्या यशानंतर राहुल गांधी यांनी ‘गायब हो गया’ या टॅगलाईनखाली पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करणार असल्याचे संकेत दिले आहेत.

राफेल विमान खरेदीची फाईल चोरीला गेल्याचे सरकारने सुप्रीम कोर्टात सांगितल्यानंतर मोदी सरकारवर सर्वच स्तरातून शंका उपस्थित केली जात आहे. फाईल चोरी होताना चौकीदार झोपला होता का? याबाबतची प्रतिक्रिया व जोक्स सोशल मिडियात सध्या तुफान हिट झाले आहेत. त्याचवेळी राहुल गांधी यांनी गायब हो गया ही नवी टॅगलाईन आली असल्याचा उल्लेख केला.

राहुल गांधी म्हणाले की, एक नवी लाईन समोर आली आहे ‘गायब हो गया’. २ कोटी युवकांना रोजगार, शेतक-यांना योग्य भाव, प्रत्येक भारतीयांच्या खात्यात १५ लाख जमा होणार, शेतक-यांच्या विम्याचे पैसे आणि राफेल आदींच्या फाईल गायब झाल्या आहेत, अशी टीका काँग्रेस अध्यक्षांनी केली.

राहुल गांधी यांनी काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करताना ‘चौकीदार चोर है’ ही संज्ञा वापरली होती. ती संज्ञा, टॅगलाईन सोशल मिडियात व मुख्य धारेतील माध्यमांतही लक्षणीयरित्या गाजली. काँग्रेस नेत्यांनी चौकीदार चोर है ही टॅगलाईन व्यवस्थितरित्या जनतेत पोहचवली. यामुळे भाजप नेत्यांनाही ‘चौकीदार चोर नही ईमानदार है’ असे स्पष्टीकरण देत बसावे लागले. आता चौकीदार…. यशानंतर राहुल यांनी ‘गायब हो गया’ ही टॅगलाईन आणली आहे. ही टॅगलाईन किती हिट होते ते येत्या काळातच दिसून येईलच.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button