breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

बिग बॉस 14 : अभिनेता सिद्धार्थ शुक्ला जखमी

मुंबई – छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध रियालिटी शो ‘बिग बॉस’च्या १४व्या पर्वाचा ग्रँड प्रीमियर शनिवारी दणक्यात पार पडला. शनिवारी सर्व स्पर्धकांची बिग बॉसच्या घरात शानदार एंट्री झाली. महत्त्वाचे म्हणजे शोच्या सुरुवातीलाच घरात दोन अभिनेत्रींमध्ये चांगलीच जुंपली. तर दुसरीकडे ‘बिग बॉस १३’चा विजेता आणि यंदाचा घरातील सिनिअर स्पर्धक अभिनेता सिद्धार्थ शुक्ला जखमी झाला. सिद्धार्थ शुक्ला स्वयंपाक घरात भाजी चिरत असताना त्याचे बोट कापल्याने घरात चांगलाच गोंधळ निर्माण झाला. सिद्धार्थच्या जखमेवर औषध लावण्यासाठी घरातील इतर सदस्यांची धावपळ सुरू झाली होती. मात्र साधारण जखम असल्याचे म्हणत सिद्धार्थने सर्वांना टाळले.

यंदा ‘बिग बॉस 14’च्या घरातील नव्या स्पर्धकांना कामे वाटून देण्याची जबाबदारी मागील पर्वातील तीन स्पर्धक सिद्धार्थ शुक्ला, गौहर खान, हीना खान यांच्यावर सोपविण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी ‘बिग बॉस’ने गौहर खानला कन्फेशन खोलीत बोलावून नियमावली दिली. या नियमावलीनुसार, ‘बिग बॉस’च्या स्वयंपाक घराचा ताबा गौहरकडे सोपवण्यात आला आहे. तर बेडरूमसंबंधित सर्व निर्णय सिद्धार्थ शुक्ला घेणार आहे. तसेच ‘बिग बॉस 14’चे आकर्षण असणारे बीबी मॉल, स्पा आणि जिम हे हीना खानच्या देखरेखीत असणार आहे.

दरम्यान, ‘बिग बॉस 14’च्या घरात कालच्या भागात निक्की तंबोली आणि जास्मीनमध्ये जोरदार भांडण झालेले पाहायला मिळाले. कामांच्या विभागणी दरम्यान भांडी घासण्याच्या कामावरून या दोघींमध्ये भांडण झाले. नखं खराब होतील, असे कारण देत निक्कीने घरातील भांडी घासण्यास नकार दिला. त्यावर जास्मीनने तिला थोडे सहकार्य करण्यास सांगितले. मात्र तिने काही ऐकले नाही. त्यानंतर दोघींमध्ये कडाक्याचे भांडण झाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button