breaking-newsताज्या घडामोडीपुणे

राष्ट्रीय कवितेची परंपरा सावरकरांनी पुढे नेली : प्रदीप निफाडकर

– रसिक मित्र मंडळाच्या व्याख्यानात प्रतिपादन

पुणे । प्रतिनिधी

राष्ट्रीय कवीता लिहिणाऱ्या कवींमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिभा उंच आहे. ऐतिहासिक राष्ट्रीय कविताच्या प्रकाशात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कविता अभ्यासल्या पाहिजेत. मराठी राष्ट्रीय कवितेची महादेव कुंटे, विनायक करंदीकर यांची परंपरा सावरकरांनी पुढे नेली. सावरकरांसोबत सर्वच राष्ट्रीय कवींचा तुलनात्मक अभ्यास झाला पाहिजे’, असे प्रतिपादन कवी प्रदीप निफाडकर यांनी केले.

रसिक मित्र मंडळ आयोजित ‘ एक कवी, एक भाषा ‘ या व्याख्यानमालेत ‘ स्वातंत्र्यवीर सावरकर – एक कवी ‘ या विषयावर ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर हे उपस्थित होते. या व्याख्यानमालेतील हे ६७ वे व्याख्यान होते.

रसिक मित्र मंडळ चे अध्यक्ष सुरेशचंद्र सुरतवाला यांच्या हस्ते यावेळी रणजीत सावरकर यांचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम पत्रकार संघ येथे शुक्रवारी सायंकाळी झाला.

निफाडकर म्हणाले, ‘सावरकरांना लहानपणापासून काव्याची आवड आणि प्रतिभा होती. ‘ ने मजसी ने परत मातृभुमीला , सागरा प्राण तळमळला ‘, ‘ जयोस्तुते ‘ अशा ठराविक कविता पालिकडे जाऊन सावरकर हे संवेदनशील, रोमँटिक काव्य लिहिणारे कवी होते. देशावर लेखन हा देखील रोमँटिसिझमचा प्रकार आहे.

‘ तनुवेल ‘, ‘ लगट अंगाला ‘ सारख्या तरल कविता या सावरकरांच्या रोमँटिसिझमची साक्ष आहेत. ऐतिहासिक राष्ट्रीय कविताच्या प्रकाशात सावरकरांच्या कविता अभ्यासल्या पाहिजेत. राष्ट्रीय कवितेची महादेव कुंटे, विनायक करंदीकर यांची परंपरा सावरकरांनी पुढे नेली.

मोरोपंताचा प्रभाव सावरकरांवर होता. मात्र, यमकांचा अट्टहास त्यांनी टाळला. कवितेच्या १० , ४८८ ओळी त्यांनी लिहिल्या, हाही विक्रम म्हणावा लागेल.
उर्दू कविततेतही काफिया,रदीफचे नियम पाळले आहेत. सावरकर हे जुन्या नव्या मराठी कवितेचे सेतू आहेत. त्यांनी उधळलेले शब्दांचे बहर झेलण्यात आपण कमी पडलो,असेही निफाडकर म्हणाले.

रणजीत सावरकर म्हणाले, ‘ मुळात सावरकर हे कवी होते. त्यांनी कवितेला देशभक्तीची प्रखर दिशा दिली. डॉ.सलीम चिश्ती, रफीक काझी, डॉ. सागर देशपांडे, गोगटे यांच्यासह अनेक मान्यवर सभागृहात उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button