TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपिंपरी / चिंचवडराजकारणराष्ट्रिय

देशाच्या विकासात सीएंची महत्वपूर्ण भूमिका : केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. कराड

पिंपरी : दि इंस्टिट्यूट ऑफ़ चॅर्टर्ड अकौंटंट ऑफ इंडिया पिंपरी चिंचवड शाखेस केंद्रीय राज्य अर्थमंत्री मंत्री डॉ. भागवत कराड यांनी सदिच्छा भेट दिली. योगायोगाने सीए संस्थेची जाहीर झालेल्या नवीन कार्यकारिणीचा सत्कार मंत्री डॉ कराड यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी आपल्या भाषणात डॉ. कराड म्हणाले की, देशाच्या विकासात सीए महत्वाची भुमिका बजावतात . भारतीय अर्थव्यवस्था ११ वरुन ५ क्रमांकावर पोहचवली आहे. तीला आता १ वर नेण्याच्या प्रयत्नांमध्ये सर्व सीएं चे महत्वाचे भूमिका असणार आहे. असा विश्वास त्यांनी व्यक्त केली आहे. यावर्षी जो अर्थसंकल्प सादर केला तो सर्वसामान्यांना दिलासा देणाऱा आहे. या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी १० लाख कोटींची तरतूद केली आहे.उद्योजक व व्यावसायिक यांना “पतहमी” देण्यात आली आहे.सर्वसामान्य करदाते व उद्योगक्षेत्राला उभारी देणारा अर्थसंकल्प ठरला आहे.अशी अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये त्यांनी यावेळी सांगितली.

आय.सी.ए.आय च्या पिंपरी चिंचवड शाखेचे नविन पदाधिकारी पुढीलप्रमाणे :
सीए सचिन बन्सल(अध्यक्ष), सीए पंकज पाटणी(उपाध्यक्ष), सीए सारिका चोरडिया(सचिव), सीए वैभव मोदी(
खजिनदार / विद्यार्थी परिषद अध्यक्ष) यांनी काल आपला नवा कार्यभार स्विकारला. या कार्यक्रमास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, उद्योजक विकास जगताप,सी.ए अशोक पगारिया ,सी.ए बबन डांगळे ,सी.ए संतोष संचेती ,सी.ए राजेश अग्रवाल, सी.ए मनोज अग्रवाल व सीए. आमोद भाटे आदी मान्यवर उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button