breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“राष्ट्रवादी” ने धनगर समाजाला विधानपरिषदेत प्रतिनिधित्व द्यावे- बापूराव सोलणकर

बारामती:– येत्या २१ तारखेला विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीमध्ये धनगर समाजाला प्रतिनिधित्व मिळावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दौंड तालुका पक्षनिरीक्षक बापूराव सोलणकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाची लोकसंख्या दोन कोटींच्या वर आहे धनगर समाजाचे ७५ विधानसभा मतदार संघामध्ये प्राबल्य आहे, समाजाची पुणे, सातारा ,सांगली, सोलापूर,कोल्हापूर, उस्मानाबाद, परभणी, बीड,नगर, जालना, नांदेड या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने मोठी ताकत आहे, लोकसभा, विधानसभा निवडणुकीत धनगर समाजाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साथ दिली आहे, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये समाजाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साथ दिल्यामुळे राष्ट्रवादीच्या जागा वाढल्या आहेत विधान परिषदेत धनगर समाजाचा एक ही आमदार पक्षाकडून नाही तरी धनगर समाजाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधानपरिषदेला प्रतिनिधित्व दिले तर यापुढील निवडणुकीमध्ये याचा फायदा पक्षाला होणार आहे असे यावेळी सोलणकर यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button