breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

राष्ट्रवादी उपमहापाैरासह शिवसेना आमदारांच्या जावयाला पाच दिवस पोलिस कोठडी

पिंपरी – राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये सोमवारी पिंपरीमध्ये जोरदार हाणामारी झाली. या प्रकरणी खुनी हल्ल्याचे परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी माजी उपमहापौर डब्बू आसवानी यांच्यासह शिवसेना आमदार गाैतम चाबुकस्वार यांचे जावई बबलू सोनकर यांच्यासह दोन्ही गटातील पाच जणांना अटक केली आहे. मंगळवारी न्यायालयाने त्यांना पाच दिवसाची कोठडी सुनावली आहे.

शिवसेनाचा कार्यकर्ता अभिनवकुमार सुरेंद्रकुमार सिंग (वय ३०, रा. मिष्ट्री पॅलेस, तपोवन मंदिराजवळ पिंपरी) यांच्या फिर्यादीवरून उपमहापाैर डब्बु आसवाणी यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल झाला. सिंग यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादी हे बबलु सोनकर यांचे चारचाकी चालक असून सोनकर यांचे सासरे गौतम चाबुकस्वार हे पिंपरी विधानसभा मतदार संघात शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार आहेत. त्यामुळे बबलु सोनकर व त्यांचे कार्यकर्ते सोमवारी सकाळी पिंपरीत फिरत होते. त्यावेळी आसवाणी यांच्या घरासमोर आले असता आसवाणी यांनी सोनकर यांना अडवून त्यांना तसेच त्यांचे कार्यकर्ते अनिल पारचा, उमाशंकर राजभर व फिर्यादी यांना लाकडी बांबू व सिमेंटचे गठ्ठू याने मारहाण करत गंभीर जखमी करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

तर माजी उपमहापौर आसवाणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवसेनेचे बबलु सोनकर (वय ४०), जितू मंगतानी (वय ३२), माजी नगरसेवक अरूण टाक (वय ४०), दीपक टाक (वय ३८), लच्छु बुतानी (वय ५५), मोहीत बुलानी (वय ३०), अनिल पारचा (वय ३५) यांच्यासह बबलु सोनकर यांची तीन बॉडीगार्ड यांच्यावर कलम ३०७ (जिवे मारण्याचा प्रयत्न), अत्यार कायदा व इतर कलमान्वये गुन्हा दाखल झाला. यापैकी बबलु सोनकर, जितु मंगतानी, लच्छु बुलानी यांना अटक करण्यात आली आहे.

आसवाणी यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी यांनी घरी येऊन बेकायदा जमाव जमवून अरूण टाक व दीपक टाक यांनी डब्बू आसवाणी यांना धरून म्हणाले की, “बबलु इसको खल्लास कर दे”, त्यावेळी बबलु सोनकर यांनी आसवानी यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याचे हातातील गन आसवानी यांच्या डोक्याला लावून ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जितु मंगतानी याने त्याच्या हातातील गन आसवाणी यांच्या कार्यकर्त्यांना दाखवून “कोणीमध्ये पडले तर एकएकाला खल्लास करतो”, असे मोठ्याने ओरडून दहशत निर्माण करून आसवानी यांना जबरदस्तीने इनोव्हा कारमध्ये बसविण्याता प्रयत्न केला.

त्यांच्यावर खुनी हल्ल्याचे परस्पर विरोधी गुन्हे दाखल आहेत. सोमवारी निवडणुकीच्या दिवशी राजकीय वैमनस्यातून दोन्ही गटांनी एकमेकांवर खूनी हल्ले केले. त्यानंतर पोलिसांनी पाच जणांची धरपकड केली.

दरम्यान, पोलिसांनी एक रिव्हॉल्वर व त्याचे ५ राऊंड, एक पिस्टल व त्याचे ६ राऊंड तसेच इनोव्हा गाडी (नंबर एमएच १४ बीके ९०५०) असा ८ लाख ७७ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक केलेल्या आरोपींना मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले होते. त्यावेळी न्यायालयाने त्यांना पाच दिवस २७ ऑक्टोबर) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button