breaking-newsपिंपरी / चिंचवड

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्र युनिटच्या वतीने राजगृहावरील हल्ल्याची CID चौकशी व्हावी यासाठी तीव्र निर्दर्शने

पिंपरी|

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्र युनिटच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहावरील भ्याड हल्ल्याचा निषेध करत आणि या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी या मागणीसाठी तीव्र निर्दर्शने करण्यात आली आहे.

महाविकास आघाडीकडून दलित आदिवासी, मागासवर्गीय, महिला आणि कायदा सुव्यवस्थेबद्दल मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून या समुदायावर मोठ्या संख्येने अत्याचार वाढत आहेत. त्यातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिष्टेचे दादर स्थित राजगृहावरील झालेला भ्याड हल्ला म्हणजे राज्यातील कायदा सुव्यवस्थेची धिंडवडे निघाले आहेत. या घटनेचा तीव्र निषेध करण्याकरिता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) पश्चिम महाराष्ट्र युनिटच्या वतीने पिंपरी पोलीस स्टेशन च्या पुढे तीव्र निर्दर्शने करण्यात आली.

या निदर्शनाचे नेतृत्व रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) पश्चिम महाराष्ट्र युनिटचे सचिव रमेश चिमुरकर यांनी केलं. या वेगळी पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सम्राट जकात, महिला शहराध्यक्ष पिंपरी चिंचवड कमलाताई कांबळे, यांच्यासह इतर पदाधिकारीहा उपस्थित होते. रमेश चिमुरकर यांच्या नेतृत्वात याप्रसंगी विविध वावगेळ्या मागण्यांचे निवेदन पोलीस निरीक्षण पिंपरी चिंचवड यांना देण्यात आले त्यात दलित, मागासवर्गीय, महिला अत्याचाराच्या घटनांचे फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये चालवावे, राजगृह भ्याड हल्ला ची सीआयडी चौकशी करावी, सारथी चा निधी इतरत्र वळवू नये, दलित – आदिवासींना स्वस्वरक्षणाकरिता परवाने देण्यात यावे. या मागण्या करण्यात आल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button