breaking-newsपिंपरी / चिंचवड

राष्ट्रवादी असंघटीत कामगार विभागाच्या वतीने पोलिसांना कोविड काढा आणि शक्तीवर्धक गोळ्या

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी विविध उपक्रम राबविले. राष्ट्रवादी कॉंग्रेस असंघटीत कामगार संघटनेच्या जिल्हाध्यक्षा मिना मोहिते यांनी या सुवर्णक्षणाचे औचित्य साधून कोविड 19 काळात आपल्या प्राणाची बाजी लावणा-या कर्तबगार पोलीस कर्मचा-यांना कोरोना योध्याचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. तसेच, त्यांना शक्तीवर्धन काढा ही देण्यात आला.

गेल्या चार महिन्यांपासून कोरोनाचा पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये अक्षरषः कहर सुरू आहे. या कोरोनासोबत जीवन जगणे नको-नकोशे झाले आहे. अशा परिस्थितीत नागरिकांसाठी प्राणाची बाजी लावून सेवा करणा-या पोलीस अधिकारी तसेच कर्मचा-यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस असंघटीत कामगार विभागाच्या अध्यक्षा मीना मोहिते यांनी दखल घेतली आहे. गेल्या चार महिन्यांपासून मीनाताई  मोहिते पक्षातर्फे पोलिसांना शक्य तेवढे सहकार्य करत आहेत. त्यामुळे पोलिसांनाही आपली दखल घेणारे कोणीतरी आहे, याची जाणीव होऊ लागली आहे. सध्या संपूर्ण शहरात कोरोनाची आपत्ती आहे. प्रत्येक नागरिकाला तोंड द्यावे लागत आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आहोरात्र पहारा देणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सेवेची दखल घेऊन मीनाताई  मोहिते जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी असंघटित कामगार विभाग व शहराध्यक्ष सलीम आतार राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी असंघटित कामगार विभाग. व प्रांत ग्राहक संरक्षण परिषद समिती अध्यक्ष पिंपरी-चिंचवड शहर. तसेच ADV पंजाबराव इंगळे चिंचवड विधानसभा कायदेशीर सल्लागार. नितीन शेठ गायकवाड उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असंघटित कामगार विभाग यांनी त्यांना कोरोना योध्दा म्हणून सन्मान दिला आहे.

संघटनेच्या वतीने पोलीस आयुक्तालयात जाऊन पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई तसेच अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, सह पोलीस आयुक्त (गुन्हे 1) राजराम पाटील, रिडर सीपी राहुल नाईक व पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सीनिअर पीआय ज्ञानेश्वर साबळे, सहायक कामगार आयुक्त अभय गिते यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांना शक्तीवर्धक काढा देण्यात आला. शक्तीवर्धक गोळ्याही वाटप करण्यात आल्या.

यावेळी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी असंघटित कामगार विभाग संघटनेच्या पुणे जिल्हा अध्यक्षा मीना मोहिते, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सलिम आतार, उपाध्यक्ष नितीन गायकवाड, ADV पंजाबराव इंगळे, कायदेशीर सल्लागार पुणे जिल्हा उपाध्यक्षा जयश्री प्रसाद, पुणे जिल्हा सचिव गायत्री असवले, समाजसेवक अरुण अवधूत, भूषण शिरसाठ, राजेंद्र मोहिते, मोहसिन हुसेन मुलानी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button