breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

राष्ट्रवादीला धक्का, मुंबईचे अध्यक्ष सचिन अहिर यांचा शिवसेना प्रवेश

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईतून मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘मातोश्री’वर शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांनी आपण राष्ट्रवादी फोडण्याचं काम करणार नाही, पण शिवसेना वाढवण्याचं काम नक्की करु, असंही सुचक वक्तव्य केलं.

सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशावेळी सचिन अहिर यांचे समर्थक आणि शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सचिन अहिर म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे यांनी जे स्वप्न पाहिलं ते शहरांच्या विकासाचं स्वप्न पुढे नेण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी प्रामाणिकपणे केलं आहे. महाराष्ट्रात शहरांची संख्या वाढत असून त्यामुळे नागरिकांचे प्रश्न देखील वाढत आहेत. ते प्रश्न सोडवण्यासाठी आदित्य ठाकरेंकडे एक स्वप्न आहे. त्या स्वप्नात मी त्यांची साथ देईल. आदित्या ठाकरेंकडे राजकारणाचं स्पिरिट आहे. मी त्यांच्यावर याआधी टीका केली होती, मात्र त्यांनी खिलाडूवृत्ती दाखवली. ते त्यांच्या विचारातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचं जतन करत आहेत.”

उद्धव ठाकरेंचे आशिर्वाद माझ्यासोबत असल्याचं म्हणत अहिर यांनी उद्धव ठाकरेंना कोणताही पक्ष फोडायचा नसून शिवसेना वाढवायची असल्याचंही सांगितलं. होतं. तसेच त्याच विचाराने माझे सर्व कार्यकर्ते मोठ्या जिद्दीने आणि जोमाने काम करतील. राज्यभरातील माझे कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेशास उत्सुक आहेत. त्यांच्यासाठी वेगळा कार्यक्रम घेऊ, असंही नमूद केलं.

यावेळी आदित्य ठाकरे यांनीही आपली भूमिका मांडली. आदित्य ठाकरे म्हणाले, “काही दिवसांपासून सचिन अहिर यांच्याशी चर्चा सुरु होती. त्यावेळी महाराष्ट्रात काम करायचं असेल तर सोबत काम करावे लागेल हे लक्षात आलं. त्यानंतर सचिन अहिर यांनी शिवसेनेत काम करण्याची इच्छा व्यक्ती केली आणि मग मी त्यांची उद्धव ठाकरे यांच्याशी भेट करुन दिली. त्या भेटीनंतर त्यांनी हा निर्णय घेतला. याचा शिवसेना मोठा फायदा होईल. शिवसेनेची आणि महाराष्ट्राची स्वप्नं त्यामुळे पूर्ण होतील.”

‘शरद पवार हृदयात, तर शरीरात उध्दव आणि आदित्य राहतील’

यावेळी अहिर यांनी आपण हा निर्णय शरद पवार यांना सांगितला नसल्याचंही नमूद केलं. ते म्हणाले, “मी गेल्या आठवड्यात शरद पवारांना भेटलो. त्यांना माझ्या मतदारसंघाची माहिती दिली. मात्र, हा निर्णय मी त्यांना सांगू शकलो नाही. शरद पवार माझ्या ह्रदयात आहेत, तर उद्धव आणि आदित्य माझ्या शरीरात राहतील. आम्ही राष्ट्रवादी तोडण्याचं काम करणार नाही, तर शिवसेना पक्ष वाढवण्याचं काम करु. माझे कार्यकर्ते मोठया जिद्दीने व जोमाने काम करतील आणि महाराष्ट्रात सत्तेत येतील.”

दरम्यान, सचिन अहिर म्हणाले, “आदरणीय पवारसाहेबांची साथ मिळाली. ती न सुटणारी साथ आहे. राजकारणात काही वेळी काही निर्णय घ्यावे लागतात. ते योग्य आहेत की नाही हे काळ ठरवतो. आदित्यसारख्या तरुणाशी माझी चर्चा झाली. वेगळ्या प्रकारचं विकासाचं काम करण्याचं काम त्याच्या मनात आहे. त्याची जिद्द आहे. अशावेळी राज्यभरातील अशा तरुणांना साथ देणं, उद्धव ठाकरे, बाळासाहेबांचं स्वप्न साकार करण्याची संधी माझ्यासारख्याला मिळत आहे. त्यामुळे निर्णय घेतला.”

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button