breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नागरिकांना आता घरबसल्या मिळणार पालिकेच्या योजनांची माहिती

  • नागरवस्ती विकास योजना विभाग झाला ‘हायटेक’
  • नागरिकांच्या सोयीसाठी विकसित केले अधुनिक ‘मोबाईल एप’

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाद्वारे राबविण्यात येणा-या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आता नागरिकांना पालिकेच्या दारात हेलपाटे मारण्याची गरज नाही. कारण, योजनांच्या लाभाची प्रक्रिया आता घरबसल्या जाणून घेता येणार आहे. तशी माहिती देणारे ‘Nagarvasti pcmc’ हे ‘मोबाईल एप’ (Mobile APP) महापालिकेने विकसित केले आहे.

शहरातील विविध प्रवर्गातील नागरिकांच्या कल्याणासाठी महापालिका वेगवेगळ्या प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविते. त्यासाठी अर्जदारांना क्षेत्रीय कार्यालय किंवा थेट महापालिका भवनामधील नागरवस्ती विकास योजना विभागात येऊन अर्ज भरावा लागतो. कागदपत्रांची पुर्तता न झाल्यास अर्ज अपात्र ठरल्यानंतर पुन्हा हेलपाटे मारावे लागतात. अर्ज दाखल होऊन लाभ मिळेपर्यंत नागरिकांची ससेहोलपट होते. हा सर्व उद्योग कंटाळवाना वाटू लागल्याने योजनांकडे पाहण्याचा नागरिकांचा दृष्टीकोण दुय्यम होऊ लागला आहे. परंतु, नागरिकांना या त्रासातून कायमचे मुक्त करण्यासाठी नागरवस्ती विकास योजना विभागाने अधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून अर्जदारांचे काम अत्यंत सुलभ केले आहे.

महापालिकेने नागरवस्ती विकास योजना विभागाच्या सर्व योजनांची माहिती मोबाईल एपवर उपलब्ध करून दिली आहे. नागरिकांना घरबसल्या योजनांचा लाभ घेता येणार आहे. योजनेसाठी अर्ज दाखल केल्यानंतर अर्जाची प्रक्रिया, अर्ज पात्र ठरला की अपात्र, पात्र ठरल्यानंतर किती वेळात लाभ मिळणार, याची माहिती या मोबाईल एपद्वारे जाणून घेता येणार आहे. या एपमुळे नागरिकांना होणारा त्रास दूर झाला आहे. या मोबाईल एपमध्ये आधार क्रमांक नमूद केल्यानंतर अर्जदारांच्या अर्ज प्रक्रियेची माहिती उपलब्ध होते.

नागरिकांच्या हितासाठी महापालिका राबवित असलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती घरबसल्या पाहता यावी. याकरिता पालिकेने अत्याधुनिक तंत्रज्ञान उपयोगात आणून नव्या युगाला साजेसं नागरवस्ती विकास योजना विभागाचं मोबाईल एप विकसित केलं आहे. यामुळे अर्जदारांना त्यांनी दाखल केलेल्या अर्जाची माहिती घरबसल्या पाहता येणार आहे.

संभाजी ऐवले, समाज विकास अधिकारी, महापालिका

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button