breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर, 40 दिग्गज नेत्यांची नावे
पुणे |महाईन्यूज|
विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. राज्यभरात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने आज 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. हे 40 स्टार प्रचारक निवडणुकीत विरोधकांवर निशाणा साधणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूकीच्या अनुषंगाने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. यामध्ये राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्व जेष्ठ नेत्यांसह युवकांचा देखील समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारणी समितीचे सदस्य व पक्षाचे स्थायी राष्ट्रीय सचिव एस. आर. कोहली यांनी प्रचारकांची ही यादी पक्षाच्यावतीने जाहीर केली आहे.