breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या मुंबईतील बैठकीत कार्यकर्त्यांची हाणामारी

मुंबई, – विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीवेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे. या सगळ्या राड्यामुळे काही काळ राष्ट्रवादीच्या मुख्यालयाबाहेर तणावाचं वातावरण तयार झालं होतं.

लोकसभेतील पराभवावर चिंतन करण्यासाठी राष्ट्रवादीचे मराठवाड्यातील कार्यकर्ते मुंबईत आले आहेत. बैठीकवेळी परभणी मतदारसंघातील गंगाखेडच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला आणि नंतर या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. लोकसभा निवडणुकीत परभणीमध्ये पक्षाच्या उमेदवाराचा नेमका कुणामुळे पराभव झाला, या मुद्यावरुन कार्यकर्त्यांमध्ये ही वादावादी झाली आहे. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर हा वाद थांबला आहे.

राष्ट्रवादीची मुंबईतील बैठक

शरद पवार यांच्या उपस्थिती होत असलेल्या राष्ट्रवादीच्या या बैठकीत मराठवाडा विभागात असलेल्या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित आहेत.

लोकसभा निवडणुकीत मराठवाडा विभागात राष्ट्रवादीला एकही जागा जिंकता आली नाही. उस्मानाबाद, परभणी, बीड लोकसभा मतदारसंघात पक्षाची ताकद असून पक्षाला लोकसभेला यश मिळवता आलं नाही. त्यातच बीड जिल्ह्यातील जयदत्त क्षीरसागर यांनी पक्षातील अंतर्गत कलहावर टीका करत शिवसेनेत प्रवेश केला. आता राष्ट्रवादीला आगामी विधानसभा निवडणुकीत यश मिळवण्यासाठी मेहनत करावी लागणार आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button