breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांचा पोलीस आयुक्तालयावर ‘हल्लाबोल’

पिंपरी, (महाईन्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या चिखलीतील संपर्क कार्यालयावर सहा ते सात तरुणांनी सशस्त्र हल्ला केला होता. कार्यालयातील फोटो, कम्प्युटरची तोडफोड केली होती. ही गंभीर घटना घडून पंधरा दिवसांचा कालावधी उलटला तरी हल्ल्यामागील खरा सुत्रधार पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. पोलिसांकडून गुन्ह्याचा तपास लावण्यात कार्यतत्परता दाखविली जात नसल्यामुळे शहर राष्ट्रवादीकडून आज दुपारी साडेतीनच्या सुमारास पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या कार्यालयावर हल्ला झाला. हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप साने यांनी केला आहे. त्याचा तपासही पोलिसांकडून सुरू आहे. पंधरा दिवस उलटले तरी पोलिसांना हल्ल्यामागील खरा सुत्रधार पकडता आलेला नाही. उलट या हल्ल्याच्या तपासाला प्रेम प्रकरणाचा मुलामा देऊन पोलीस दिशाभूल करत असल्याचा आरोपही राजकीय क्षेत्रातून केला जात आहे. तर, सत्ताधारी भाजपच्या दबावाला बळी पडून पोलीस तपासात हयगय करत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे साने यांच्यावरील नियोजित प्राणघातक हल्ल्याचा कट रचणारा खरा सुत्रधार पकडला जात नसल्याचा आरोप पोलिसांवर होत आहे.

पोलिसांच्या हलगर्जीपणाच्या विरोधात पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीच्या वतीने पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. आज दुपारी साडेतीनच्या सुमारास हा मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी कळविली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button