breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नागपूर महापालिकेच्या धरतीवर होणा-या स्मार्ट वॉच खरेदेला तुर्तास ब्रेक

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – स्वच्छ सर्वेक्षणाच्या नावाखाली आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचा-यांसाठी ४ हजार ५४४ स्मार्ट वॉच (घड्याळे) थेट पध्दतीने खरेदी करण्याच्या प्रस्तावाला तुर्तास ब्रेक लागला आहे. हा प्रस्ताव मंगळवारी (दि.11) स्थायी समितीने तहकूब केला आहे. तसेच, प्रशासनाने सविस्तर माहिती सादर केल्याशिवाय हा प्रस्ताव मंजूर करणार नसल्याचे स्थायी समितीने स्पष्ट केले आहे.

आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचा-यांसाठी घड्याळे खरेदीचा फार्स सुरू आहे. या घड्याळांची खरेदी मे. आयटीआय लि. (बेंगलोर) या संस्थेकडून थेट पध्दतीने केली जाणार आहे. चार वर्षासाठी प्रतिनग २८७ रुपये या दराने ४ हजार स्मार्ट वॉच खरेदी केले जाणार आहेत. त्यासाठी दरमहा १३ लाख ४ हजार १२८ रुपये या प्रमाणे एक वर्षासाठी एकूण १ कोटी ५६ लाख ४९ हजार ५३६ असे एकूण चार वर्षासाठी एकूण ६ कोटी २५ लाख ९८ हजार १४४ रुपये खर्च केले जाणार आहेत.

हा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीपुढे होता. थेट पध्दतीने होणारी ही खरेदी नागपूर महापालिकेच्या धर्तीवर केली जात आहे. त्यावर विरोधी पक्षाने आरोप करत खरेदी रद्द करण्याची मागणी केली. त्यामुळे स्थायी समितीने हा प्रस्ताव तहकूब केला. आगामी बैठकीत सविस्तर माहिती सादर करावी. त्यानंतर योग्य असल्यास हा प्रस्ताव मंजूर केला जाईल, असे स्थायी सदस्य विलास मडिगेरी यांनी सांगितले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button