breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ;सर्वसामान्य हवालदिल

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या किंमतीत नियमित वाढ होत आहे. जून महिन्यात अवघ्या १२ दिवसांत इंधन दरात २ रुपयांनी वाढ झालीी आहे. यामुळे अनेक शहरांत पेट्रोलचे दर १०५ रुपये प्रति लिटर झाले आहे. मुंबईमध्ये आज पेट्रोलचे दर 102.30 रुपये तर डिझेलचे दर 94.98 रुपये प्रति लीटर आहेत.

देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहे. जूनमध्ये केवळ 12 दिवसात पेट्रोलचे दर 1.63 रुपयांनी वधारले आहेत. तर डिझेलचे दर देखील 1.60 रुपये प्रति लीटरने वाढले आहे. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी चलनांच्या आधारावर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती काय आहेत, या आधारावर रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होत असतात.

देशातील महत्वाच्या शहरातील इंधनाचे दर (Petrol-Diesel Price Today)

>> दिल्ली – 96.12 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 86.98 रुपये प्रति लीटर

>> मुंबई – 102.30 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 94.39 रुपये प्रति लीटर

>> कोलकाता – 96.06 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 89.83 रुपये प्रति लीटर

>> चेन्‍नई – 97.43 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 91.64 रुपये प्रति लीटर

>> बेंगळुरु – 99.33 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 92.21 रुपये प्रति लीटर

>> नोएडा – 93.46 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 87.46 रुपये प्रति लीटर

>> जयपूर – 102.73 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 95.92 रुपये प्रति लीटर

>> भोपाल – 104.29 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 95.60 रुपये प्रति लीटर

>> श्रीगंगा नगर – 107.22 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 100.05 रुपये प्रति लीटर

>> रीवा – 106.51 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 97.65 रुपये प्रति लीटर

अशाप्रकारे तपासा पेट्रोल-डिझेलचे नवे दर

पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button