breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मॉ साहेब यांच्या ४९८ व्या जयंती निमित्त संभाजी ब्रिगेड च्या वतीने मोफत भव्य आरोग्य शिबीर

पिंपरी | महाईन्यूज

संभाजी ब्रिगेड च्या वतीने राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मॉ साहेब यांच्या ४९८ व्या जयंती निमित्त दरवर्षी प्रमाणे यंदाही रविवार दिनांक १२ जानेवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत त्रिवेणी हाॅस्पीटल वाल्हेकरवाडी चिंचवड येथे मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन केलेले आहे या शिबिराचे उद्घाटन माननीय स्मिता पाटील पोलिस उपायुक्त परीमडंल १ पिंपरी चिंचवड यांच्या हस्ते होणार असून प्रमुख उपस्थिती म्हणून संभाजी ब्रिगेडचे प्रदेश समन्वयक शांताराम बापू कुंजीर संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा अध्यक्ष विशाल तुळवे हे उपस्थित राहणार आहेत या शिबिरास रेड स्वस्तीक सोसायटी शाखा पुणे यांचेही सहकार्य लाभणार आहे या शिबिरामध्ये स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्रज्ञ डॉ. अश्विनी पवार व डॉ. मोहन पवार (MBBS, DNB, Dip Lap) .

वंध्यत्व निवारणतज्ञ डॉ.प्रितम सुलाखे (MBBS, DGO, DNB, FRM),बालरोगतज्ञ डॉ. प्राजक्ताभोकरे (MBBS, DCH) हृदयरोग व मधुमेह तज्ञ डॉ. अभिजीत शिंदे (MBBS MD), डॉ. राजहंस भोकरे (MBBS, DNB).यांचा सहभाग असणार आहे. तसेच नेत्ररोग तज्ज्ञ,अस्थीरोग तज्ज्ञ, त्वचारोगतज्ञ अशा सर्व तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर संपन्न होणार आहे. या शिबिरामध्ये गरोदर महिला, लहान बालक, पुरुष, यांची मोफत आरोग्य तपासणी करून औषध उपचार केले जातील.गर्भवती महिला व मासिक पाळीच्या समस्या असणाऱ्या स्त्रियांना प्राधान्य देऊन उपचार केले जातील.सदर शिबिरामध्ये जन्मताच व अपघाताने आलेले व्यंग आणि दुर्धर आजारावर पुढील उपचारासाठी सहकार्य केले जाईल तरी जास्तीत जास्त लोकांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड च्या वतीने करण्यात येत आहे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button